
मंगळवेढा : या मठाचा मीच पुजारी व मालक असून, तू बाहेरून आलेला आहे, तुझा येथे काहीएक संबंध नाही, असे म्हणून धर्मोपदेशक राचोटेश्वर शिवाचार्य स्वामी (वय ६४, रा. सिद्धनकेरी) यांना लोखंडी गजाने मारहाण केली. या प्रकरणी राजू लिंगाप्पा कोरे, मंजुनाथ सकलेश कोरे, भिमू सिद्धाप्पा कोरे, प्रमोद रेवाप्पा कोरे, संतोष रामचंद्र कोरे, सिद्धू येसाप्पा कोरे या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.