सोलापूर : सहायक पोलिस आयुक्‍त करणार गुन्ह्यांचा तपास

गुन्ह्यातील कलम वाढविले; चौकशीसाठी संशयितांना बोलावले
सोलापूर : सहायक पोलिस आयुक्‍त करणार गुन्ह्यांचा तपास
Updated on

सोलापूर : एमआयडीसी(MIDC) परिसरातील मुद्रा सनसिटीजवळील(Mudra suncity) ड्रेनेजलाईनमध्ये उतरलेल्या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी महापालिकेच्या (solapur carproation)संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी, दास आफशोअर, व्रज कन्स्ट्रक्‍शनचे अधिकारी व कर्मचारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस आयुक्‍त हरिष बैजल (police comissionor harish baijal)यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरु असून आता पुढील तपास सहायक पोलिस आयुक्‍तांकडे(assistant police comissionor) सोपविला जाणार आहे.

सोलापूर : सहायक पोलिस आयुक्‍त करणार गुन्ह्यांचा तपास
सोलापूर : नऊ नगरपरिषदांवर प्रशासकाची नियुक्ती

ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक अडचणी तपासण्यासाठी आत उतरलेल्या सहापैकी चौघांचा गुदमरुन मृत्यू झाला. दोघेजण बेशुध्द आढळले आणि त्यांच्यावर वेळेत उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचला. घटनेनंतर त्या कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित झाला. शेवटी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन पेटकर यांनी स्वत: पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला. जीवघेणे काम करत असतानाही तेथील इंजिनिअर, सुपरवायझर व कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑक्‍सिजन मास्क, ग्लोव्हज, सेफ्टी बेल्ट, बाहेरून ऑक्‍सिजन पुरवणारी साधने पुरविण्यात आली नाहीत. त्याचा ठपका महापालिकेचा संबंधित विभाग, कंत्राटदार कंपनी आणि ज्यांच्या नियंत्रणाखाली काम सुरु होते, त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांच्याकडे सध्या या गुन्ह्याचा तपास असून गुन्हा दाखल झालेल्या संबंधितांना त्यांनी चौकशीसाठी बोलावणे धाडले आहे.

सोलापूर : सहायक पोलिस आयुक्‍त करणार गुन्ह्यांचा तपास
"पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी"

महापालिकेकडून अद्याप मदत नाहीच

एमआयडीसी परिसरातील नव्या ड्रेनेजलाईनमध्ये गुदमरून चार कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना २३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. मृतांमधील कामगार तरूणच होते. ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. दुसरीकडे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी मृतांना प्रत्येकी दहा लाखांची मदत घोषित केली. दोन-तीन दिवसांत मदत मिळेल, अशी आशा होती. परंतु, पाच दिवस होऊनही अद्याप दमडीचीही मदत मिळालेली नाही.

सोलापूर : सहायक पोलिस आयुक्‍त करणार गुन्ह्यांचा तपास
मोहोळ नगरपरिषद, माढा, माळशिरस नगर पंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती !

अल्पवयीन मुलगा कामावर कसा?

सांगली जिल्ह्यातील अभियंत्यांसह बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेशातील एकूण चार कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये बैचन प्रभू ऋषिदेव (रा. बिहार), विशाल शिवाजी हिप्परकर (रा. सांगली), सुनिल गुल्झारिलाल ढाका (रा. राजस्थान) आणि आशिषकुमार भारतसिंग राजपूत (रा. उत्तरप्रदेश) यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे १८ वर्षांखालील मुलाला बालमजूर समजून त्यासंदर्भात कडक कायदे करण्यात आले आहेत. तरीही, ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झालेल्या चौघांमध्ये अशिषकुमार राजपूत हा १७ वर्षांचा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित मक्‍तेदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या बालमजुराला कामावर ठेवलेच कसे, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com