esakal | लाचखोर पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस कोठडी! दोघेही सेवेतून निलंबित
sakal

बोलून बातमी शोधा

लाचखोर पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस कोठडी! दोघेही सेवेतून निलंबित

त्या दोघांना सेवेतून निलंबित केल्याची माहिती पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिली

लाचखोर पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस कोठडी! दोघेही सेवेतून निलंबित

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : दाखल गुन्ह्यात मदत करतो म्हणून संशयित आरोपीकडून (तक्रारदार) साडेसात लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे याला लाचलुचत प्रतिबंधत विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार यांचाही समावेश असल्याचे उघड झाले. त्या दोघांनाही शनिवारी (ता.10) न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली. त्या दोघांना सेवेतून निलंबित केल्याची माहिती पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिली.(assistant inspector rohan khandagale has been arrested for taking bribe from an accused in solapur)

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 199 शाळा मुख्याध्यापकांविनाच !

शेतातून परस्पर मुरूम नेल्याप्रकरणी शेतकऱ्याने एकाविरूध्द सलगर वस्ती पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर संशयित आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी कारवाई करताना त्या संशयित आरोपीच्या दोन गाड्या पोलिस ठाण्यात आणून लावल्या. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे याच्याकडे तपास सोपविला होता. त्याने गुन्ह्यात मदत करतो म्हणून संशयित आरोपीकडे दहा लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती ठरलेले साडेसात लाख रुपये एकाचवेळी देण्याचे ठरले.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील लस पुन्हा संपली !

दरम्यान, त्या संशयित आरोपीने लाचलुचत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. जुना पुना नाका परिसरात रक्‍कम देण्याचे ठरले, त्याचवेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचला. रक्‍कम स्वीकारताना खंडागळेला रंगेहाथ पकडले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या सांगण्यावरून ही रक्‍कम घेतल्याचे त्याने कबूल केले. विशेष म्हणजे पवार हे चार महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते. त्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या दोघांच्याही घराची झाडाझडती शनिवारी (ता. 10) रात्री घेण्यात आली. त्यावेळी काहीच हाती लागले नसून आता त्या दोघांच्याही नातेवाईकांसह कुटुंबातील सदस्यांच्या नावे असलेल्या मालमत्तेची व रकमेची चौकशी होईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 34 सराईत गुन्हेगारांना लावणार मोक्का !

महिला अधिकाऱ्याकडे पोलिस ठाण्याचा कारभार

शहरात एकूण सात पोलिस आहेत. जवळपास 60 पेक्षा अधिक पोलिस निरीक्षक असून त्यात काही वरिष्ठ पोलिस निरीक्षकही आहेत. विशेष बाब म्हणजे अनेक वर्षांपासून शहरातील एकाही पोलिस ठाण्याचा पदभार महिला अधिकाऱ्याकडे दिलेला नव्हता. दरम्यान, सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार हे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्या ठाण्याची जबाबदारी पहिल्यांदा महिला पोलिस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे. सदर बझार पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अश्‍विनी भोसले यांच्याकडे सलगर वस्ती पोलिस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.

loading image