

“Maharashtra ATS issues notice in Zubair Hangaregar–Al Qaeda link probe; Wahdat-E-Muslimeen-E-Hind office-bearer to face interrogation.”
Sakal
सोलापूर : दहशतवादविरोधी पथकाने अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित जुबेर हंगरगेकर याला अटक केली आहे. तो मूळचा सोलापूरचा असून तो १८ ते २० ऑक्टोबरला कुंभारी हद्दीतील शाळेत एका कार्यक्रमासाठी आला होता. तेथे १६ ते १८ वयोगटातील मुलांना त्याने धार्मिक धडे दिले. या कार्यक्रमात ते तीन दिवस काय बोलला याची पडताळणी करण्यासाठी ''एटीएस''ने त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ मागितले आहेत.