esakal | परदेशी सायकलस्वारांची सुटका! काय झाले नेमके? वाचा..
sakal

बोलून बातमी शोधा

परदेशी सायकलस्वारांची सुटका! काय झाले नेमके? वाचा..

जर्मनीहून आलेल्या सायकलस्वारांसोबत घडलेला प्रकार पाहून मला वाईट वाटले. परदेशी पर्यटक किंवा अन्य कोणासोबतही असे प्रकार होत असतील तर आपण मदतीसाठी गेले पाहिजे. महामार्गावर लोकांना लुटण्याच्या उद्देशाने अपघाताचा बनाव करणाऱ्या, दमदाटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करायला हवी. 
- डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, 
सदस्य, सोलापूर सायकल क्‍लब

परदेशी सायकलस्वारांची सुटका! काय झाले नेमके? वाचा..

sakal_logo
By
परशुराम कोकणे

सोलापूर : सोलापूर, तुळजापूरमार्गे नागपूरच्या दिशेने निघालेल्या दोघा परदेशी सायकलस्वारांना मद्यपी तरुणांकडून लुटण्याच्या उद्देशाने दमदाटी केल्याचा प्रकार घडला. सोलापूरचे सायकलपटू, तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात सेवेत डॉ. चंद्रकांत क्षीरसागर यांनी मद्यपींच्या तावडीतून दोघा परदेशी सायकलस्वारांची सुटका केली. 

डॉ. भोसले म्हणाले, जिल्हाधिकारी पदाचा मिरविला नाही दिवा 

दमदाटी करत सायकलींची ओढाओढ
गेल्या आठवड्यात घडलेला हा प्रसंग डॉ. क्षीरसागर यांनी "सकाळ'सोबत शेअर केला. ड्यूटीच्या निमित्ताने डॉ. क्षीरसागर हे आपल्या कारमधून सोलापूरहून तुळजापूरच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी महामार्गावरून जर्मनीहून आलेले 25 ते 30 वयोगटातील दोन परदेशी सायकलस्वार सोलापूरहून तुळजापूरमार्गे नागपूरच्या दिशेने निघाले होते. तुळजापूर रस्त्यावर एकेठिकाणी परदेशी सायकलस्वारांना दुचाकीवरून आलेल्या दोघा मद्यपी तरुणांनी अडविले. दमदाटी करत सायकलींची ओढाओढ चालू केली. डॉ. क्षीरसागर यांनी हा प्रकार पाहिला आणि आपली कार थांबवून परदेशी सायकलस्वारांना मदत करण्यासाठी धाव घेतली. तिथे लोकांची गर्दी जमली होती. 

आता रेल्वेत असं घ्या मोफत शुद्ध पाणी 

पैसे लुटण्याच्या उद्देशाने म द्यपी तरुण गोंधळ
सुरवातीला काही वेळ नेमके काय झाले आहे हे डॉ. क्षीरसागर सांना समजले नाही. त्यांनी गर्दीत जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वार दोघे तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. कदाचित रात्री झालेल्या अपघातात ते जखमी झाले असावेत. परदेशी सायकलस्वारांकडून पैसे लुटण्याच्या उद्देशाने मद्यपी तरुण गोंधळ घालत होते. त्यावेळी डॉ. क्षीरसागर यांनी स्वत:चे ओळखपत्र आणि सोलापूर सायकल क्‍लबचे स्टिकर दाखवून आपुलकीने चौकशी केली. कोणताही अपघात झाला नाही, असे परदेशी सायकलस्वारांनी सांगितले. 

पोलिस ठाण्याशी संपर्क
मद्यपी तरुणांकडून परदेशी सायकलस्वारांना लुटण्याच्या उद्देशाने सुरू असलेला प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. क्षीरसागर यांनी स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधला आणि या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर मात्र घाबरलेल्या मद्यपी तरुणांनी तेथून पळ काढला. त्यानंतर परदेशी सायकलस्वारांनी डॉ. क्षीरसागर यांचे आभार मानले. त्यांच्यासोबत पाच-सहा किलोमीटर जाऊन डॉ. क्षीरसागर यांनी पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या. 

जर्मनीहून आलेल्या सायकलस्वारांसोबत घडलेला प्रकार पाहून मला वाईट वाटले. परदेशी पर्यटक किंवा अन्य कोणासोबतही असे प्रकार होत असतील तर आपण मदतीसाठी गेले पाहिजे. महामार्गावर लोकांना लुटण्याच्या उद्देशाने अपघाताचा बनाव करणाऱ्या, दमदाटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करायला हवी. 
- डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, 
सदस्य, सोलापूर सायकल क्‍लब

loading image