esakal | माढयाचे ग्रामदैवत श्नी माढेश्वरी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
sakal

बोलून बातमी शोधा

श्नी माढेश्वरी मंदिर

माढयाचे ग्रामदैवत श्नी माढेश्वरी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

sakal_logo
By
किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : माढयाचे ग्रामदैवत श्नी माढेश्वरीचे नवरात्रोत्सवात अनेक भाविक दर्शन घेत असून मंदिर परिसर भाविक व खेळणी व विविध साहित्याच्या दुकानांनी गजबजला आहे. यात्रा पंच कमिटीचे दादासाहेब साठे यांनी स्वखर्चाने मंदिरावार आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

माढेधीपती श्रीमंत रावरंभाजी निंबाळकर यांनी 1727 च्या कालखंडात उभारलेल्या या  मंदिरास 294 वर्ष पुर्ण झाली असून नवरात्रोत्सवात अनेक भाविकांनी श्नी. माढेश्वरी देवीचे दर्शन घेतले आहे. माढयासह पंचक्रोशीतील अनेक भाविक‌ श्नी‌. माढेश्वरी देवीच्या आरतीला उपस्थितीत दर्शवत आहेत. नवरात्रोत्सवातील उपवास व आराधी मंडळींची देवीची गीते यामुळे वातावरण भक्तिमय बनले आहे. यात्रा पंच कमिटीचे दादासाहेब साठे यांनी मंदिराचे मुख्य शिखर, गोपुर, होमहवन शिखर व मंदिराच्या तटबंदीवर स्वखर्चाने दरवर्षीप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंदिराचे‌ ट्रस्टी अॅड. उदय पुजारी यांनी दर्शन व्यवस्थेचे नेटके नियोजन केले आहे. नवरात्रोत्सवापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत श्नी. माढेश्वरी मंदिरात भाविकांची मोठी रेलचेल असते. कोजागिरी पौर्णिमेला श्नी. माढेश्वरी देवीची तीन दिवसांची मोठी यात्रा भरते. यावेळी देवीचा आकर्षक असा छबिना निघतो.

हेही वाचा: महाविद्यालये सुरू होण्याची तारीख ठरली, असे असतील नियम

श्नी. माढेश्वरी देवीचा छबिना उत्सव

कोजागिरी पौर्णिमेला रात्री बारा वाजता श्नी. माढेश्वरी देवीचा छबिना उत्सव निघतो. परंपरागत वाटुन दिलेली आठ देवीची वाहने या छबिना उत्सवामध्ये पुढे मानकरी नाचवतात. माळी घराण्याला हत्ती, भांगे घराण्याला घोडा, मारकड घराण्याला नंदी, जाधव घराण्याला गरुड, रणदिवे घराण्याला वाघ, काटे घराण्याला मोर, माने घराण्याला सिंह या वाहनांवर देवीची उत्सव मुर्ती बसविली जाते. वाजत गाजत मिरवणुक काढली जाते. हा छबिना मातंगाई देवीची भेट घेऊन पहाटे पाच वाजता मंदिरात येऊन विसावतो. कलगी तुऱ्याचा मनोरंजनातुन प्रबोधनाचा कार्यक्रमही यात्राकाळात होतो. तीन दिवसीय यात्रा कुस्त्यांच्या जंगी फडाने पार पडते.

श्नी. माढेश्वरी देवीच्या मूर्तीची वैशिष्ट्ये

सिंहासनावर श्री माढेश्वरी मातेची वालुकाश्मापासुन बनविलेली मुख्य मुर्ती असून त्याच्या शेजारी उत्सवमुर्ती आहे. श्नी. माढेश्वरीची मूर्ती ही चतुर्भुज असुन एका हातात ढाल, दुसऱ्या हातात शंख चक्र, तिसऱ्या हातात महिशासुराची शेंडी तर चौथ्या हातात त्रिशुल आहे. हा त्रिशुल महिशासुराच्या पोटात मारत असल्याचे मुर्तीचे मुळ रुप आहे. देवीच्या मुर्तीची उंची तीन फुट असुन मुकूटाजवळ चंद्र, सुर्य असुन कपाळावर चकचकीत मणी आहे. मुर्तीच्या मागच्या बाजुला मोर, नाग, दैत्य यांची कोरीव प्रभावळ आहे. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूस श्री. गणेशाचे व महादेवाचे तर डाव्या बाजूस श्री. विष्णूचे मंदिर आहे.

loading image
go to top