
Audit report exposes wasteful spending on Aaple Sarkar Seva Kendras in Solapur district.
Sakal
सोलापूर: प्रत्येक ग्रामपंचायतीस आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यात आले, पण केंद्रांतून ज्या सेवा देणे अपेक्षित आहे, त्या दिल्या जात नाहीत. येथून रेल्वे, बस आरक्षण, बॅंकिंग सेवा, आधार नोंदणी, पासपोर्ट, वीजबिल, पोस्ट सेवा या सेवा देणे अपेक्षित असताना फक्त जमा खर्च नोंदविण्यापलीकडे कोणतेही काम केले जात नाही. यामुळे सेवा केंद्रांवरील शासनाचा खर्च वायफळ जात असल्याचे लेखापरीक्षणात नमूद केले आहे. सेवा केंद्रास दरमहा २७०० रुपये दिले जातात, पण तो निधी कंझुमेबल बाबीवर खर्च होत नसल्याचे लेखापरीक्षकांनी अहवालात नमूद केले आहे.