आसाम निवडणूक काळात उल्लेखनीय काम केल्यामुळे पंढरपूरच्या नितीन खाडे यांचा गौरव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election Commission
आसाम निवडणूक काळात उल्लेखनीय काम केल्यामुळे पंढरपूरच्या नितीन खाडे यांचा गौरव!

आसाम निवडणूक काळात उल्लेखनीय काम केल्यामुळे पंढरपूरच्या नितीन खाडे यांचा गौरव!

पंढरपूर : आसाम राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अाणि पंढरपूरचे सुपुत्र नितीन खाडे (आयएएस) यांनी आसाम निवडणूक काळात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मंगळवार (ता. 25 ) रोजी दिल्ली येथे केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. दिल्ली येथे काल राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी उप राष्ट्रपती व्य़ंकय्या नायडू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा: अहमदनगर : दोषविरहित मतदार यादीवर भर ; राजेंद्र भोसले

भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा, राजीव कुमार आणि अनुप चंद्र पांडे यावेळी व्य़ासपीठावर उपस्थित होते.आसाम मध्ये अतिरेकी, जातीय आणि वांशिक हिंसाचाराचा मोठा इतिहास आहे. निवडणूकीच्या काळात अतिरेकी हिंसाचाराच्या घटना पूर्वी अनेक वेळा घडल्या आहेत. त्यामुळे निवडणूक काळात मतदारांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे मोठे आव्हान होते. या आव्हानांचा गांभीर्याने विचार करून श्री. खाडे यांनी यंत्रणा राबवली.

हेही वाचा: अहमदनगर : दोषविरहित मतदार यादीवर भर ; राजेंद्र भोसले

अनेक प्रकरणांमध्ये कायद्याचे उल्लंघन करताना दिसणाऱ्यांच्या विरुध्द एफआयआर दाखल करण्यासाठी त्वरीत आणि प्रभावी कारवाई करण्यात अाली. सोशल मिडियावरुन आणि प्रत्यक्ष शांतता आणि सौदार्ह बिघडवणाऱ्या अनेक घटनांना वेळीच आणि कठोर उपाय करुन आळा घालण्यात आला. पोलिस अाणि प्रत्यक्ष निवडणूक यंत्रणेत समन्वय राखण्यात आला.सहायक मतदान केंद्रांच्या निर्मितीमुळे मतदान केंद्रांची संख्या पाच हजाराने वाढल्याने मनुष्यबळाची व्यवस्था आणि त्यांचे प्रशिक्षण हे मोठेआव्हान होते. या सर्व आव्हानांचा विचार करून श्री. खाडे यांनी नियोजन बद्ध काम केले.

कोविड सह अनेक अाव्हाने समोर असताना देखील श्री.खाडे यांनी अत्यंत नियोजनपूर्वक अाणि काटेकोरपणे यंत्रणा राबवली. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत असताना निवडणूक निष्पक्ष रितीने पार पडावी, जास्तीत जास्त मतदारांनी कोविड च्या अनुषंगाने नियमांचे पालन करत मतदानाचा हक्क बजावावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या कामाची दखल भारत निवडणूक अायोगाने घेतली असून त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात अाली होती.दिल्ली य़ेथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त एका खास कार्यक्रमाचे अायोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नितीन खाडे यांना गौरविण्यात आले.

हेही वाचा: शेती उत्पन्न बाजार समितीच्या २९ कर्मचाऱ्यांची सेवा अधांतरीच

श्री.खाडे यांनी काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अापल्या कामाचा ठसा उमटवला होता. प्रामुख्याने बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी ऊस तोड मजूरांच्या मुलांसाठी वसतिगृह, महिला बचत गटांचा तेजस ब्रॅन्ड असे अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले होते. वंचित, उपेक्षित, निराधार अाणि मजूर असलेल्या महिला सक्षम अाणि स्वावलंबी बनाव्यात या उदात्त हेतूने त्यांनी महिला बचत गट चळवळीला जाणीवपूर्वक बळ दिले होते.बचत गटांच्या महिलांना विविध वस्तू व खाद्य पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी तेजस नावाचा महिला बचत गट उत्पादनाचा तेजस नावाचा ब्रॅन्ड विकसित केला.या उत्पादनाच्या विक्रीत वाढ व्हावी यासाठी भव्य प्रदर्शऩाचे अायोजन केले.खाडे यांनी याच काळात ऊस तोड मजूर महिलांच्या अारोग्यासाठी वैशिष्ठ्यपूर्ण असा अायुर्मंगलम हा उपक्रम राबवला. त्याचा फायदा शेकडो गरजू महिलांना झाला. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी खाडे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा गौरव केला होता. श्री खाडे हे आता आसाम मध्ये मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटल्याने त्यांचे कौतुक होत आहे.