

Ayurvedic Tea Business Flourishes, Providing Livelihood to Dozens Across Maharashtra
sakal
सोलापूर: कोरोनाकाळात बांधकाम व्यवसायातील रक्कम अडकून आर्थिक संकट आले. त्यातून खचून न जाता पंढरपूरच्या धनंजय रुपनर यांनी आयुर्वेदिक घटकांवर संशोधन करून चहा मसाल्याची निर्मिती केली. संशोधनाधारित या उत्पादनाच्या बळावर त्यांनी चहाच्या व्यवसायाचे जाळे उभे केले असून, आज २१ आउटलेटच्या माध्यमातून सुमारे ६० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.