
Madhuri Navle celebrates her gold medal achievement in postgraduate studies, 23 years after marriage.
Sakal
सोलापूर: लग्नानंतर पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या माधुरी नवले यांना जुळ्या मुलींमुळे पदव्युत्तर पदवीचे स्वप्न अधुरे राहिले. पती उच्चशिक्षित, तर आपले शिक्षण त्यांच्याहून कमी असल्याची खंत त्यांच्या मनी होती. मात्र, त्याऐवजी मुलांच्या जडणघडणीला प्राधान्य देत समाधान मानले. मुलींच्या पदवी प्रवेशानंतर म्हणजे लग्नानंतर २१ वर्षांनी पदव्युत्तर पदवीसाठी मास कम्युनिकेशनला प्रवेश घेतला. कौटुंबिक जबाबदाऱ्या, अभ्यास ही तारेवरची कसरत लीलया करत त्यांनी प्रत्येक सेमिस्टरला यशाची कमान कायम राखली. शेवटी पदव्युत्तर पदवीमध्ये विद्यापीठात सुवर्णपदक पटकावले.