

“Banjara community rally in Solapur for ST reservation, with traditional bullock carts and vibrant attire.”
Sakal
सोलापूर: बंजारा समाजाला अनुसूचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमाती (एसटी) चे आरक्षण असताना महाराष्ट्रात केवळ विमुक्त जाती (व्हीजे) म्हणून आरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीत महाराष्ट्रातील बंजारा समाज मागे पडला आहे. हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा, लंबाडा व सुगळी समाज हा भटकंती करणारा व आदिवासी जीवनशैली जपणारा समाज असल्याची नोंद असल्याने, बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्य बंजारा (एसटी) आरक्षण कृती समितीच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.