

Banjara community stages protest march in Solapur, demanding ST reservation.
Sakal
सोलापूर: बंजारा समाज इतिहास, परंपरा, जीवनशैली, सामाजिक आर्थिक स्थिती या निकषानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट होण्यास पात्र असूनही केवळ महाराष्ट्रात व्हीजेएनटी या प्रवर्गात ठेवण्यात आले आहे. बंजारा समाजाला राज्यात एसटी आरक्षण देण्याच्या मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.