esakal | बॅंकेत एका वेळी तीन-चार ग्राहकांनाच प्रवेश 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

बॅंक ऑफ इंडियाने कर्मचाऱ्यांकडून घेतले घोषणापत्र 
कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने बॅंक ऑफ इंडियाच्यावतीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. बॅंक ऑफ इंडियात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून स्वयंघोषणापत्र घेण्यात येणार आहे. या घोषणापत्र मध्ये कर्मचाऱ्याचे आजारपण (सर्दी, ताप, खोकला) याबद्दलची माहिती व स्वतःची ट्रॅव्हल हिस्टरी कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार आहे. सोलापूर विभागाचे व्यवस्थापक अजय कडू म्हणाले, सोलापूर विभागातील सात जिल्ह्यात 854 कर्मचारी कार्यरत आहे. एका दिवशी पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांनी डिजिटल बॅंकिंगचा वापर करावा असे आवाहनही विभागीय व्यवस्थापक कडू यांनी केले आहे. 

बॅंकेत एका वेळी तीन-चार ग्राहकांनाच प्रवेश 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विविध आदेश पारित केले आहेत. अत्यावश्‍यक सेवा, बॅंका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेत असताना बॅंक शाखेत एका वेळी जास्तीत जास्त तीन ते चार ग्राहकांनाच प्रवेश द्यावा, या ग्राहकांचे काम झाल्यानंतर पुढील ग्राहकांना प्रवेश देण्याचा आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सहकारी व राष्ट्रीयकृत बॅंकांना दिला आहे. 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील आधार केंद्र, महा-ई-सेवा केंद्र आणि सीएससी केंद्र बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. 
हेही वाचा - कोरोना संशयिताचा रेल्वे प्रवास! उद्यान एक्‍सप्रेसचा डबा सील 
बॅंकांच्या बाहेर ग्राहकांची रांग लागल्यास दोन रांगांमध्ये पाच फूट अंतर असावे, 31 मार्चपर्यंत बॅंकांनी फक्त रोख भरणा व रक्कम काढणे ही दोनच कामे प्राधान्याने करावीत. या कामांसाठी बॅंकेने पुरेसे कर्मचारी नेमावेत. जेणेकरून ग्राहकांना कमीत कमी वेळेत बॅंकेतील काम पूर्ण करता येईल अशी सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली आहे. जिल्ह्यातील बॅंक प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या सूचना करण्यात आल्या आहेत. या बैठकीला जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे उपस्थित होते. ग्राहकांनी बॅंकेच्या इतर पर्यायाचा (इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, यूपीआय, एटीएम, कॅश डिपॉझिट मशिन) लाभ घ्यावा, ग्राहकांनी बॅंकेच्या काउंटर पासून तीन ते पाच फुटांचे अंतर ठेवावे व गर्दी टाळावी असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

loading image