Solapur Loksabha Constituency : निवडणुकीच्या तोंडावर बॅनरबाजी चर्चेची

लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी निश्चित नसताना तालुक्यातील मूलभूत प्रश्न निवडणुकीचे मुद्दे महत्वाचे ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
Solapur Loksabha Constituency
Solapur Loksabha Constituencysakal

मंगळवेढा: लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी निश्चित नसताना तालुक्यातील मूलभूत प्रश्न निवडणुकीचे मुद्दे महत्वाचे ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहेत. शहरातील प्रमुख चौकात शेतकऱ्याच्या समस्यांचा पाढा वाचणारे बॅनर् झळकले असून शहर व तालुक्यात याची चर्चा रंगली.

या बॅनरबाजीमधून गेल्या अनेक वर्षांच्या तालुक्यातील समस्यांचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचे चित्र दिसत आहे.शहरातील चौकात आवाज सोलापूरचा या कॅम्पेनचे बॅनर्स दिसून येत आहेत. यावर सरकारच्या आश्वासनांची पोलखोल करणारी शेरेबाजी करत जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यात आली. आवाज सोलापूरचा ही मोहीम कोणाकडून राबवली जात आहे, याची माहिती समोर आली नसली तरीही पाणी प्रश्न,दुष्काळ,अवकाळीची भरपाई, रस्ते, कचरा प्रश्न अशा विविध समस्यांवर अस्सल सोलापुरी भाषेतून लोकांच्या भावना मांडल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Solapur Loksabha Constituency
Solapur Crime News : कुमठा नाका परिसरातील दगडफेकप्रकरणी ११ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी

गेली अनेक वर्षे सर्वच पक्षाच्या सत्ताधाऱ्यांकडून तालुक्याच्या व शेतकरी विकासाची स्वप्ने दाखविण्यात आली.आता लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवणारे बॅनर्स लागल्यामुळे राजकारणात सत्ताधाऱ्यांना आरसा दाखविण्याचा प्रयत्न या बॅनर्समधून केला.

ग्रामीण भागातही बॅनरबाजी

ग्रामीण भागात देखील अशाच प्रकारचे शेती आणि महागाईशी निगडीत प्रश्न उपस्थित करणारे बॅनर्स मतदारसंघात गावोगावी लावण्यात आल्याचे दिसून आले आहे. यामध्ये पिकाला नाही भाव, शेतकऱ्यांना नाही किंमत बळीराजा या सरकारला दाखव तुझी हिंमत अशा आशयच्या बॅनर्स लावून शेतकऱ्यांना आगामी निवडणुकीत आश्वासनांचे गाजर दाखवणाऱ्या विरोधात हिंमत दाखवण्याचे आवाहन करण्यात आले.

सध्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतीउत्पन्नाता खर्च दुप्पट झाला आहे. पिकाला पाणी देण्यासाठी धरणातून वेळेत पाणी उपलब्ध होत नाही, पाणी मिळाले तर वीजेचा तुटवडा यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून ब्र शब्द काढला जात नाही. शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून आवाज सोलापूरच्या या कॅम्पेनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे बॅनर्स गावोगावी लावण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com