ई-पीक नोंदणीमध्ये जिल्ह्यात बार्शी अन्‌ अक्कलकोट अव्वल !

ई-पीक नोंदणीमध्ये जिल्ह्यात बार्शी अन्‌ अक्कलकोट अव्वल !
ई-पीक नोंदणीमध्ये जिल्ह्यात बार्शी अन्‌ अक्कलकोट अव्वल !
ई-पीक नोंदणीमध्ये जिल्ह्यात बार्शी अन्‌ अक्कलकोट अव्वल !Canva
Summary

'माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा' हा उपक्रम शासनाने 15 ऑगस्टपासून सुरू केला असून, सातबारा उताऱ्यावर पिकांच्या नोंदी करण्यासाठी ई-पीक पाहणी अ‍ॅप लॉंच केले आहे.

सासुरे (सोलापूर) : शासनाने खुले केलेले ई-पीक (E-Crop) पाहणी अ‍ॅप शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढविणारे बनले होते; मात्र मागील चार दिवसांपासून हे अ‍ॅप तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे चित्र आता नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाढलेल्या सहभागावरून दिसून आले आहे. या ई-पीक पाहणी नोंदणी कार्यक्रमामध्ये सोलापूर (Solapur) जिल्ह्यात बार्शी (Barshi) आणि अक्कलकोट (Akkalkot) तालुका सर्वांत अव्वल राहिले आहेत.

ई-पीक नोंदणीमध्ये जिल्ह्यात बार्शी अन्‌ अक्कलकोट अव्वल !
भोंदू मनोहरमामाचा 'अटकपूर्व'चा प्लॅन पोलिसांनी लावला उधळवून!

'माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा' हा उपक्रम शासनाने 15 ऑगस्टपासून सुरू केला असून, सातबारा उताऱ्यावर पिकांच्या नोंदी करण्यासाठी ई-पीक पाहणी अ‍ॅप लॉंच केले आहे. ई-पीक पाहणी अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात दोन लाख 36 हजार 202 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये अक्कलकोट आणि बार्शी हे दोन तालुके आघाडीवर असून, यातील बार्शी तालुक्‍यातील 1 लाख 8 हजार 460 शेतकऱ्यांपैकी आतापर्यत 27 हजार 613 शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये अ‍ॅक्‍टिव्ह खातेदार 26 हजार 248 असून 7 हजार 832 शेतकरी ऑनलाइन नोंदणीत फेल झाल्याची माहिती समोर आली आहे.

तर अक्कलकोट तालुक्‍यामध्ये आतापर्यंत 28 हजार 382 शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये अ‍ॅक्‍टिव्ह खातेदार 26 हजार 538 असून 12 हजार 163 शेतकरी ऑनलाइन नोंदणीत फेल झाल्याची माहिती समोर आली आहे. ई-पीक पाहणी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची अचूक नोंदणी करावी, यासाठी तहसीलदार सुनील शेरखाने, नायब तहसीलदार संजय मुंढे यांच्यासह मंडळ अधिकारी व तलाठी आवश्‍यकतेनुसार मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे गावनिहाय पिकांची अचूक माहिती उपलब्ध होत आहे.

शेतकरी पीक पेरा लावण्यासाठी मोबाईलवर ई-पीक पाहणी अ‍ॅप डाउनलोड करू लागले आहेत. आणि ओटीपी लक्षात ठेवून माहिती भरायला सुरवातही करीत आहेत. नाव, गाव, गट नंबर, सर्व्हे नंबर सगळे टाकून झाले. सोयाबीन, उडीद, द्राक्ष, केळी, भेंडी, मका, बाजरी, ज्वारी, आदींसोबत उभा राहून फोटो काढला; पण डाउनलोड होईना; कारण रेंज येत नाही. आता ही तक्रार कोणाकडे करायची? उन्हातान्हात उभे राहून रेंज येण्याची वाट पाहात बसावे लागत आहे. तरीही जमिनीची नोंद टाकली व त्यात आपण पेरणी केलेल्या पिकांची नोंद केली तर पलीकडून मेसेज येतो, तुमच्या नावाने तेवढी जमीनच नाही म्हणून. ही समस्या आपल्या टेक्‍नॉलॉजीची; मग आता हा टेक्‍निकल प्रॉब्लेम कोण दूर करणार? असा सवालही केला जात आहे.

ई-पीक नोंदणीमध्ये जिल्ह्यात बार्शी अन्‌ अक्कलकोट अव्वल !
अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडेंच्या आठवणीतील तपास !

शासनाने ई-पीक पाहणी अ‍ॅप 15 ऑगस्टपासून कार्यान्वित केले आहे. पीक पाहणी अ‍ॅपद्वारे पिकाच्या नोंदणीसाठी सुरवातीला काही दिवस हे अ‍ॅप कसे हाताळायचे हे शेतकऱ्याच्या लक्षात येत नव्हते. त्यामुळे शेतकरी भांबावले होते. महसूल विभागाने केलेल्या व्यापक जनजागृतीमुळेच आता हे शक्‍य झाले आहे.

- सुनील शेरखाने, तहसीलदार, बार्शी

शासनाने दिलेल्या मुदतीत ऑनलाइन पिकाची नोंद सातबारा उताऱ्यावर घेणे शक्‍य नसल्याचे शासनाने आता 30 सप्टेंबरपर्यत पिकांची नोंदी करण्यासाठी मुदत वाढवली आहे.

- सूरज वाघमारे, तलाठी, सासुरे

ई-पीक अ‍ॅप हाताळणीसाठी खूप सोपे आहे. शेतकरी स्वतःच सातबाऱ्यावर स्वतःचा पीक पेरा नोंदविणार असल्याने यामध्ये पारदर्शकता आली आहे.

- गुलाब आवारे, शेतकरी, सासुरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com