

Heavy Turnout in Barshi APMC Election With 96.98% Voting
Sakal
बार्शी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोळा जागांसाठी रविवार (ता.७) रोजी उत्स्फुर्त मतदान झाले शहरातील सुलाखे हायस्कूल, नवीन मराठी शाळा येथे सात मतदान केंद्रावर तर वैराग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तीन मतदान केंद्रावर चुरशीने मतदान झाले सकाळपासून मतदान केंद्राबाहेर विद्यमान आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे गट तळ ठोकून होते मतदान प्रक्रिया संल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करुन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.