डॉ.अंधारे हॉस्पिटलच्या डॉक्टर विरोधात तक्रारकर्त्यास धमकी

डॉ.अंधारे हॉस्पिटलच्या डॉक्टर विरोधात तक्रारकर्त्यास धमकी
Summary

दमदाटी तक्रारकर्त्यास केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत दोन जणांविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

बार्शी (सोलापूर) : शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या डॉ.अंधारे हॉस्पिटल (Dr. Andhare Hospital) मधील डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर दोघांनी तुम्ही तक्रार का दिली, आपसात बसवून मिटवून घ्या नाहीतर हे प्रकरण तुम्हाला जड जाईल, अशी दमदाटी तक्रारकर्त्यास केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत दोन जणांविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. (Barshi city police has registered a case against two persons in connection with Dr. Andhare Hospital case)

डॉ.अंधारे हॉस्पिटलच्या डॉक्टर विरोधात तक्रारकर्त्यास धमकी
बालवयातच 'ती'च्या स्वप्नांचे छाटले पंख! लॉकडाउनमध्ये लहान मुलींचे गुपचूप विवाह

श्रीधर झुंबर अंधारे, अजित अंधारे (दोघे रा.अलिपूर रोड) अशी अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संदीप चर्तुभूज सुतार (वय ३३, रा.फुले प्लॉट) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना 3 जून रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. शहर पोलिसांत 7 जून रोजी दुपारी तीन वाजता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ.अंधारे हॉस्पिटलच्या डॉक्टर विरोधात तक्रारकर्त्यास धमकी
ग्रामीणमधील मृत्यू रोखण्यात प्रशासन अपयशी

येथील बीव्हीजी कंपनीत संदीप सुतार नोकरीस असून 15 एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास त्यांची आई आशा चर्तुभूज सुतार डॉ.अंधारे यांच्या सुश्रूत हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेले होते. डॉक्टरांनी आईची तपासणी करुन रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले, त्यानुसार 15 दिवस उपचार केले. उपचारादरम्यान आईचे निधन झाले. त्यानंतर हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दिली होती.

डॉ.अंधारे हॉस्पिटलच्या डॉक्टर विरोधात तक्रारकर्त्यास धमकी
पंढरपुरात दोन लाख रुपयांचा देशी दारुचा साठा जप्त

 तुम्ही तक्रार का दिली, आपसात बसवून मिटवून घ्या, नाहीतर हे प्रकरण तुम्हाला जड जाईल, असे म्हणत दोघांनी शिवीगाळ करुन, तुझ्या भावाची नोकरी घालवीन अशी दमदाटी केली असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास बार्शी पोलिस करीत आहेत. (Barshi city police has registered a case against two persons in connection with Dr. Andhare Hospital case)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com