पंढरपुरात दोन लाख रुपयांचा देशी दारुचा साठा जप्त

पंढरपुरात दोन लाख रुपयांचा देशी दारुचा साठा जप्त
Summary

लॉकडाऊन काळामध्ये देशी दारू, जुगार, वाळूचोरी, मटका, घरफोडी यासारख्या अवैध धंद्यामुळे शहर व तालुक्यातील कायदा सु्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरु आहेत. अशा अवैध धंद्याविरोधात पंढरपूर पोलिसांनी व्यापक मोहिम उघडली आहे. मंगळवारी (ता.8) रात्री येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी रांझणी (ता.पंढरपूर) येथे केलेल्या कारवाईत तब्बल 2 लाख 1 हजार 600 रुपयांच्या देशीदारुचा अवैधसाठा जप्त केला आहे. यामध्ये 70 बॉक्समध्ये सुमारे 3 हजार 360 देशी दारुच्या बाटल्यांचा समावेश आहे. (stocks of native liquor confiscated a case has been registered against two persons in pandharpur)

पंढरपुरात दोन लाख रुपयांचा देशी दारुचा साठा जप्त
आषाढी वारी यंदाही प्रतिकात्मकच

लॉकडाऊन काळामध्ये देशी दारू, जुगार, वाळूचोरी, मटका, घरफोडी यासारख्या अवैध धंद्यामुळे शहर व तालुक्यातील कायदा सु्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अलीकडेच वेळापूर येथे अवैध दारु विक्री करणाऱ्या जमावाने पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. पंढरपूर शहर व तालुक्यातील अवैध धंद्याची जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गंभीर दखल घेतली असून अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांनी स्वतः पोलिसांना तशा सूचना दिल्या आहेत. त्यानंतर पंढरपूर पोलिस सतर्क झाले आहेत.

पंढरपुरात दोन लाख रुपयांचा देशी दारुचा साठा जप्त
राजन पाटील, बळीराम काका अन्‌ यशवंत मानेंची पालकमंत्र्यांविरूध्द तक्रार

रांझणी येथील जगदंब हॉटेल मध्ये देशी दारुची अवैधपणे विक्री केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसोबत घेवून जगदंब हॉटेलवर छापा टाकला असता, देशी दारुचा अवैध साठा आढळून आला. अधिक माहिती घेतली असता हॉटेलचालकाच्या घरी तब्बल 3 हजार 330 बाटल्यांचा देशी दारुचा अवैध साठा आढळून आला.

पंढरपुरात दोन लाख रुपयांचा देशी दारुचा साठा जप्त
बालवयातच 'ती'च्या स्वप्नांचे छाटले पंख! लॉकडाउनमध्ये लहान मुलींचे गुपचूप विवाह

याप्रकरणी प्रदीप बाळासाहेब आवताडे आणि नागेश ढोणे यांना अटक करुन पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसापूर्वी मंगळवेढा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी जयश्री पाटील यांनी 63 लाख रुपये किंमतीचा 11 पोती गांजा पंढरपूरहून महूद कडे जात असताना पकडला आहे. पंढरपुरातील वाढत्या अवैध धंद्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. (stocks of native liquor confiscated a case has been registered against two persons in pandharpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com