बार्शी तालुक्यात सात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर

21 डिसेंबर रोजी शांततेत मतदान (Voting) झाले व 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले.
Election Result
Election Resultsakal
Updated on

Solapur News : बार्शी (Barshi News) तालुक्यात तुळशीदास नगर,गुळपोळी,शेळगाव(आर), धामणगाव,अलिपूर,श्रीपतपिंपरी,पांगरी अशा सात ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी एक प्रभागाची पोटनिवडणूक झाली असून निकाल जाहीर करण्यात आले. झानपूर येथील निकाल राखून ठेवला आहे. 21 डिसेंबर रोजी शांततेत मतदान (Voting) झाले व 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. अशी माहिती नायब तहसीलदार माजीद काझी यांनी दिली.

तुळशीदास नगर येथे प्रभाग क्रमांक एक मध्ये झालेल्या निवडणुकीत मंगल भास्कर भोईटे 76 मते मिळवून विजयी झाल्या त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रभावती भीष्माचार्य मोटे यांना 62 मते पडली नोटाला तीन मते मिळाली. गुळपोळी येथे प्रभाग क्रमांक तीन मध्ये झालेल्या निवडणुकीत सविता दिपक चिकने 347 मते मिळवून विजयी झाल्या असून त्यांच्या प्रतिस्पर्धी मंदाकिनी विष्णू सावंत यांना 232 मते मिळाली नोटाला तीन मते पडली.

Election Result
ओमिक्रॉन, डेल्टा एकत्र आल्यास मानव जातीचा नाश; शास्त्रज्ञांना भीती

शेळगाव(आर)येथील प्रभाग क्रमांक एकच्या झालेल्या निडणुकीत शैलजा सचिन बादगुडे यांनी 296 मते मिळवून विजयी झाल्या तर त्यांच्या प्रतिस्पर्धी स्वरुपा शुभम बादगुडे यांना 289 मते मिळाली नोटाला एक मत पडले. धामणगाव येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये झालेल्या निवडणुकीत रेवणकुमार जालिंदर अवधूत यांना 155 मते पडून विजयी झाले त्यांचे प्रतिस्पर्धी बळीराम सुग्रीव कुंभार यांना 39 तर अक्षय सुभाष देशमुख यांना 17 मते मिळाली नोटाला तीन मते मिळाली.

अलिपूर येथे प्रभाग क्रमांक दोन मध्ये झालेल्या निवडणुकीत बप्पा राजाराम माने यांना 87 मते मिळून विजयी झाले असून त्यांचे प्रतिस्पर्धी सागर गणपत तावडे यांना 76 मते पडली. श्रीपतपिंपरी येथील प्रभाग क्रमांक चार मध्ये झालेल्या निवडणुकीत बिभीषण गोरख लंकेश्वर 272 मते मिळून विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी रोहिदास महादेव लंकेश्वर यांना 243 मते मिळाली.

Election Result
सोलापूर : अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले; कारवाईसाठी विशेष पथक

पांगरी येथील प्रभाग क्रमांक मध्ये झालेल्या निवडणुकीत अक्षयकुमार संजय चांदणे यांना 497 मते मिळवून विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी दशरथ भास्कर बगाडे यांना 420 मते मिळाली नोटाला 19 मते मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
The programme was organised by Priyadarshini Mahila Vikas Mandal to support pilgrims during the Ashadhi Wari.
Thousands of devotees are expected to participate in the religious celebrations, with special arrangements for devotees including community fasting meals.
TET Exam
Marathi News Esakal
www.esakal.com