Barshi Crime : १०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या चौघांना अटक

बार्शी शहरातील तेलगिरणी चौक येथील मिरगणे कॉम्प्लेक्समध्ये बनावट नोटा चलनामध्ये आणणारे तरुण येणार असल्याची माहिती समजताच पोलिसांनी छापा टाकून चौघांना अटक केली.
crime
crimeesakal

बार्शी - शहरातील तेलगिरणी चौक येथील मिरगणे कॉम्प्लेक्समध्ये बनावट नोटा चलनामध्ये आणणारे तरुण येणार असल्याची माहिती समजताच पोलिसांनी छापा टाकून चौघांना अटक करुन त्यांची तपासणी केली असता शंभर रुपयांच्या २० बनावट नोटा पोलिसांनी पंचासमक्ष जप्त केल्या आहेत.

बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, न्यायालयासमोर उभे केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. आय. पठाण यांनी २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सुनिल चंदसेन कोथिंबिरे (वय-२३ मूळ रा. पिंपळगाव नाकले, ता. माजलगाव, जि. बीड, सध्या रा. माळीनगर, अंबाजोगाई, जि. बीड), आदित्य धनंजय सातभाई (वय-२२ मूळ रा. तळोली, ता. परळी, जि. बीड, सध्या रा. स्टेशन लाइन, गांधी मार्केट परळी वैजिनाथ, जि. बीड, कदीर शेख, सुनील वाघमारे (दोघे रा. अंबाजोगाई, ता. बीड) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. ही घटना १९ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान मिरगणे क्लॉम्प्लेक्स जवळ घडली.

दोन इसम बनावट चलनी नोटा घेऊन येत असून मिरगणे कॉम्प्लेक्स येथील गाळ्यामधील व्यापारी यांचेकडे त्या चलनात आणल्या जाणार आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता.

पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, हवालदार रेवणनाथ भोंग, श्रीमंत खराडे, रामेश्वर मस्के यांनी शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनामध्ये आणण्याचा प्रयत्न करीत असताना चौघांना रंगेहाथ पकडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com