Land Purchase Fraud of ₹11.57 Lakh Reported in Barshi
बार्शी : सुर्डी (ता. बार्शी) येथे माझी जमीन असून मला विक्री करायची आहे त्यापैकी दोन एकर शेती तूम्ही मला टप्प्या टप्प्याने खरेदीचे पैसे द्या सहा महिन्यात खरेदीचा व्यवहार पूर्ण करतो असे सांगून ११ लाख ५७ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विनोद विठ्ठल जगताप (रा. मुळे प्लॉट, सोलापुर रोड, बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे सुप्रिया गजानन हिरापूरे (रा. सोलापूर रोड, बार्शी) यांनी फिर्याद दाखल केली ही घटना २३ फेब्रुवारी २०२३ ते ४ मार्च २०२५ दरम्यान घडली.