
वैराग : बार्शी शहर ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने नियोजनबद्ध तपास, तांत्रिक विश्लेषण व समन्वित कारवाईद्वारे बार्शी–परंडा परिसरात कार्यरत असलेले अमली पदार्थ विक्री रॅकेट उघडकीस आणण्यात मोठे यश मिळवले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून बार्शी शहर पोलिस ठाण्यास गौरवपत्र प्रदान करण्यात आले.