बार्शी: वाहनातून गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती बार्शी तालुका पोलिस ठाण्यास समजताच, पथकाने सापळा रचून बार्शी- भोयरे रस्त्यावर दोन ट्रक, एक कार थांबवून १ कोटी ४० लाखांचा ६९२ किलो गांजासह वाहने जप्त केली. यातील एकास ताब्यात घेण्यात आले आहे. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अशोक सायकर यांनी दिली.