Barshi Crime : बार्शीत एसटी वाहकाला मारहाण; कॉलर पकडून धमक्या, ३ हजार रुपये गायब; दोघांवर गुन्हा दाखल!

ST Conductor Assault : बार्शी बसस्थानकावर वाहकाला प्रवाशांनी केलेल्या मारहाणीत तिघे हजार रुपये गायब झाले असून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेमुळे बसस्थानक सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
The ST bus stand in Barshi where two passengers allegedly assaulted the conductor

The ST bus stand in Barshi where two passengers allegedly assaulted the conductor

Sakal

Updated on

बार्शी : बार्शी-नारायणगाव एसटी बस बार्शी बसस्थानकावर येताच लांबचे प्रवासी अगोदर बसा,कुर्डुवाडीचे नंतर बसा असे वाहकाने म्हणताच कुर्डुवाडीचे प्रवासी पैसे देत नाहीत का?असे म्हणत दोघांनी वाहकाची गच्ची पकडून मारहाण केली असून धक्काबुक्कीमध्ये तीन हजार रुपये गायब झाले आहेत शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ चंद्रशेखर खुडे(रा.लहुजी चौक,सुभाषनगर,बार्शी),सुरज चंद्रशेखर खुडे रा.माजीवाडा,साईनाथनगर,साई मंदीराजवळ,ठाणे (वेस्ट)जि. ठाणे)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com