
“Kategaon bridge in Barshi Taluka restored after heavy rains; road repaired for smooth traffic.”
Sakal
सोलापूर: जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे, घरांचे तसेच रस्त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते पूल वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला होता. काटेगाव चारे पाथरी पांगरी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक २९ रस्त्यावरील काटेगाव येथील पूल अतिवृष्टीने वाहून गेला होता. त्याठिकाणी नळकांड्या व मुरूम भरावा करून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.