
सोलापूर : बार्शीतील श्रीशैल परमेश्वर कानुरे (वय २७) या तरुणाला रेल्वेत नोकरी लावतो म्हणून बार्शी येथील समाधान बालाजी वट्टमवार याने पावणेदोन लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद पांगरी पोलिसांत दाखल झाली होती. वट्टमवार याने कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर सहायक कनिष्ठ लेखापाल पदावर नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन आणि रेल्वेचे खोटे नियुक्ती पत्र दिले होते.