
बार्शी: शहरातील श्री भगवंत मंदिर मार्गावर भरवस्तीमध्ये असलेल्या पौराणिक श्रीराम मंदिराच्या दरवाजाचे ग्रील वाकवून आठवड्यात दोनदा चोरीचा प्रयत्न झाला. शनिवारी चोरट्यांनी दानपेटीतील रक्कम लंपास केली. तर रविवारी परत राममूर्ती गर्भगृहाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. पण पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही. मंदिराच्या पुजाऱ्याचा तक्रार अर्ज घेऊन त्यास पोच देऊन घरी पाठविण्यात आले.