esakal | बार्शीत विद्यार्थिनीची आत्महत्या!
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या

बार्शीत विद्यार्थिनीची आत्महत्या!

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : येथील नर्सिंग लेडीज हॉस्टेल येथे राहणाऱ्या विज्ञान ( भाग 2 ) मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने  रुममध्ये छाताच्या हुकला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून बार्शी शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

हेही वाचा: ढगफुटीच्या हिटलिस्टवर महाराष्ट्र

सायली शिवाजी जगताप ( वय 21 रा . पालशिंगन ता . जि .बीड ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे नर्सिंग कॉलेजच्या रेक्टर संज्योती काळे यांनी पोलिसांत नोंद केली ही घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान उघडकीस आली .

विज्ञान ( भाग एक ) वर्षाचा निकाल 10 सप्टेंबर रोजी ऑनलाइन जाहीर झाला होता सायली जगताप विज्ञान प्रथम वर्षाच्या परीक्षेत काहीं विषयांत नापास झाली होती .

हेही वाचा: खादी ग्रामोद्योग मंडळाच्या परभणीतील केंद्राला घरघर

नापास झाल्याने सायली खूप नाराज झाली होती रेक्टर काळे यांचेसह तिच्या मैत्रिणींनी तिची समजूत काढली होती . शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान कॉलेजमधील रुम क्रमांक अकरामध्ये सायलीने छताच्या हुकला ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले .

तेथील इतर मुलींनी रेक्टर यांना बोलावून घेऊन माहिती दिली तिच्या आई - वडील , चुलते यांचेसह पोलिसांना घटनेची माहिती त्वरीत देण्यात आली अशी पोलिसात केलेल्या नोंदीतील माहितीमध्ये म्हटले आहे तपास पोलिस हवालदार कोळेकर करीत आहेत .

loading image
go to top