esakal | खादी ग्रामोद्योग मंडळाच्या परभणीतील केंद्राला घरघर
sakal

बोलून बातमी शोधा

parbhani

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या परभणीतील केंद्राला घरघर

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : खादीच्या कपड्यांना प्रचंड मागणी असतांनाही केवळ खादी ग्रामोद्योग महामंडळातील अधिकाऱ्यांची उदासिनता, केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षीपणा व लालफितीच्या कारभारामुळे केंद्रांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. भारताचे वैभव असणाऱ्या खादी ग्रामोद्योगाच्या उत्पादनांना विविध कारणामुळेच पाहिजे त्या प्रमाणात झळाली प्राप्त होतांना दिसून येत नाही.

परभणीतील खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या एकमेव केंद्राची आवस्था ही काही अशीच झालेली पहावायस मिळत आहे. कर्मचाऱ्यांचा लालफिती कारभार, ग्राहकांप्रती उदासिनता, व्यवस्थापनाच्या अभावामुळे या केंद्राकडे ग्राहक अभावानेत फिरकत असल्याचे चित्र आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळून देण्यासाठी केंद्रस्तरावरून प्रयत्न सुरु आहेत. त्याद्वारे देशातंर्गत उत्पादित केलेल्या मालाची विक्री व्हावी व देशातील शेवटच्या घटकातील उद्योजक स्वंयपूर्ण व्हावा हा त्या मागील उद्देश आहे. परंतु या उद्देशालाच येथील व्यवस्थापन हरताळ फासत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: शिक्षण सभापतींचे अध्यक्षांना आव्हान! वाद चव्हाट्यावर

देशात अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून खादीचे कापड तयार करण्याचा व्यवसाय चालतो. त्यासाठी खादी ग्रामोद्योग महामंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या महामंडळाद्वारे राज्यभरात खादीच्या कपड्यांची

विक्री करणारे केंद्र उभारण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळी या केंद्राद्वारे मोठी उलाढाल होत असे. परंतू जस - जसा काळ बदलत गेला तस तसा या केंद्रांना बकाल अवस्था प्राप्त होत गेली आहे.

परभणीतील केंद्र रेल्वेवेळापत्रकानुसार

परभणी शहरातही खादी ग्रामोद्योग महामंडळाचे एक केंद्र गेल्या अनेक वर्षापासून कार्यान्वीत आहे. परंतु या केंद्रातर्फे न कधी जनजागृती केल्या जाते न प्रसिध्दी. त्यामुळे अनेकांना शहरात असे केंद्र आहे, याची माहिती सुध्दा नाही. पुर्वी या केंद्रामार्फतसर्व उत्पादनाची विक्री व उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असे. परंतू कर्मचाऱ्यांच्या धोरण लकव्यामुळे या केंद्राची अधोगती सुरु झाली आहे. या केंद्रातील बहुतांश कर्मचारी नांदेड येथून ये-जा करतात. त्यामुळे केंद्राच्या वेळा रेल्वेवेळापत्रकानुसार चालतात. दुकान उघडण्याची व बंद करण्याच्या वेळा निश्चित नाहीत. केंद्र कधी बंद राहील, हे देखील निश्चित नसते. त्यामुळे अनेकवेळा आलेले खादी प्रेमी परत जातात. साधा ध्वज घेण्यासाठी सुध्दा अनेक वेळेस खेट्या माराव्या लागतात. म्हणून ग्राहक देखील या केंद्राएैवजी अन्य खासगी खादी भांडारवर खरेदीस पसंती देत आहेत. विशेषत: खादी व ग्रामोद्यांगाच्या उत्पादनांना शहरात देखील मोठी मागणी आहे. परंतु असे असतांना देखील केंद्रावर मागणी नुसार उत्पादनाचा पुरवठा होत नाही. त्यातच कर्मचाऱ्यांची ग्राहकांबद्दलची बेफीकीर वृत्ती देखील केंद्राला घरघर लागण्यास कारणीभूत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा: दौंड : उप अधीक्षकांना बदलीची धमकी देणार्यास अटक

परभणीचे केंद्र तर मुख्य बाजारपेठेत आहे. आजुबाजूला मोठ-मोठी वस्त्रदालने आहेत. तेथील स्वच्छता, सजावटीने ग्राहक आकर्षित होतात. परंतु या केंद्राची परिस्थिती मात्र अगदी उलट आहे. दुकानात, ठेवलेल्या कपड्यांच्या ताग्यांची नियमित साफसफाई होत असल्याचे देखील दिसून येत नाही. जुनी कपाटे, त्यामध्ये तयार कपडे, व कपड्याचे तागे अस्तव्यस्त पडलेले, कोंबलेले दिसून येते. साधी स्वच्छता देखील या केंद्रात केली जात नसल्याचे दिसून येते. खासगी दुकानांच्या तुलनेत या केंद्रांना लकाकी प्राप्त करता येत नसली तरी स्वच्छता, टापटीप, ग्राहकांप्रती नम्रपणा, सौजन्यता, बोलण्याच्या पध्दती या बाबींचे येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे झाले आहे.

loading image
go to top