
सोलापूर : सोलापूर दौऱ्यावर असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी आयत्यावेळी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीचे ठिकाण बदलले. व्यस्त दौऱ्यामुळे कोर कमिटीच्या बैठकीला येण्यास त्यांना उशीर झाला. दुपारी तीन वाजता सुरू होणाऱ्या बैठकीस महसूल मंत्री साडेचार वाजता आले. आल्यानंतर व्यासपीठावर बसण्यापूर्वीच त्यांनी या ठिकाणी मी कोणतेही भाषण करणार नाही. फक्त निवेदने स्वीकारण्यासाठी व त्यावर काम करण्यासाठी आलो आहे, असे कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले.