esakal | ...अखेर पंढरपूर पं.स.चे बीडीओ कार्यमुक्त ! जि.प.चे सीईओ स्वामी यांचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

BDO Ghodke

पंढरपूर पं.स.चे बीडीओ कार्यमुक्त! जि.प.चे सीईओ स्वामी यांचे आदेश

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर पंचायत समितीचे बीडीओ रविकिरण घोडके यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर पंचायत समितीचे (Pandharpur Panchayat Samiti) बीडीओ रविकिरण घोडके (BDO Ravi Kiran Ghodke) यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Zilla Parishad Chief Executive Officer Dilip Swamy) यांनी श्री. घोडके यांना कार्यमुक्त केल्याची माहिती दिली. येथील सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेंद्र पिसे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. (BDO Ghodke of Panchayat Samiti of Pandharpur was dismissed)

हेही वाचा: "पेट'च्या 644 जागांसाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ !

बीडीओ रविकिरण घोडके हे गेल्या तीन ते चार दिवसांपासून कार्यालयात हजर नसल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या रजनी देशमुख यांनी केली होती. त्यातच करकंब ग्रामपंचायतीच्या विरोधात आठ सदस्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या वेळी देखील श्री. घोडके यांनी उपोषणाकडे पाठ फिरवली. त्यातच त्यांचा दूरध्वनीही बंद असल्याने अधिकच नाराजी वाढली आहे. या सगळ्या प्रकाराची आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) यांनीही दखल घेऊन बीडीओ श्री. घोडके यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार आज (मंगळवारी) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. स्वामी यांनी बीडीओ रविकिरण घोडके यांना पंढरपूर पंचायत समितीमधून कार्यमुक्त केले आहे. त्यांच्या जागी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. पिसे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.

हेही वाचा: आणि बनीराम पाटील झाला सखाराम कदम..!

मागील काही दिवसांपासून बीडीओ आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्यामध्ये वाद सुरू होता. बीडीओ श्री. घोडके हे मनमानी कारभार करत असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख यांनीही यापूर्वीच केली होती. त्यानंतर आज बीडीओ श्री. घोडके यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बीडीओ श्री. घोडके यांच्या संपूर्ण कार्यकाळातील कामाची चौकशी करून तसा अहवाल ग्रामविकास खात्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे श्री. स्वामी यांनी सांगितले.

loading image