esakal | "पेट'च्या 644 जागांसाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ !
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur University

"पेट'च्या 644 जागांसाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ !

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (पेट-8) अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सोमवारपासून (ता. 12) सुरू झाली आहे.

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) पीएचडी (PhD)) प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (पेट-8) अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सोमवारपासून (ता. 12) सुरू झाली आहे. विविध विषयांच्या 644 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. (Solapur University has started accepting applications for 644 seats for the PhD pre-entrance examination)

हेही वाचा: दर तासाच्या कामाचा द्या अहवाल! आयुक्तांचा फतवा; कामगार संघटनेचा विरोध

विद्यापीठाच्या sudigitaluniversity.ac या संकेतस्थळावरून 7 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. कॉमन पेपर 17 ऑगस्टला तर विशेष पेपर 18 ऑगस्टला होणार आहे. उत्तरपत्रिका 20 ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील. त्या संदर्भात काही हरकती असल्यास 25 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदवता येईल. अंतिम उत्तर पत्रिका 26 ऑगस्ट रोजी प्रकाशित होईल तर या परीक्षेचा निकाल 30 ऑगस्टला जाहीर होणार असल्याचे मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम () यांनी सांगितले. ही परीक्षा पूर्णत: ऑनलाइन पद्धतीने होणार असून परीक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांच्या हालचालींवर विशेष तंत्रज्ञानाने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा: आणि बनीराम पाटील झाला सखाराम कदम..!

अशा आहेत जागा

विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेअंतर्गत जैवतंत्रज्ञान विषयासाठी - 21, वनस्पतिशास्त्र- 15, रसायनशास्त्र- 25, सिव्हिल इंजिनिअरिंग- 3, इलेक्‍ट्रॉनिक्‍स- 1, इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन - 16, पर्यावरणशास्त्र - 2, भूगोल - 65, गणित - 3, यांत्रिक अभियांत्रिकी - 20, सूक्ष्मजीवशास्त्र - 4, औषधनिर्माणशास्त्र - 17, पदार्थविज्ञान -1 8, संख्याशास्त्र - 8 तर प्राणिशास्त्र विषयासाठी 21 जागा आहेत.

मानव विज्ञान विद्याशाखेअंतर्गत प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्रासाठी - 1, अर्थशास्त्र - 5, इंग्रजी - 38, हिंदी - 56, इतिहास - 29, कन्नड - 4, मराठी - 95, तत्त्वज्ञान - 4, राज्यशास्त्र - 21, प्राकृत - 4, मानसशास्त्र सहा तर समाजशास्त्र विषयासाठी सात जागा आहेत. वाणिज्य व व्यवस्थापन अकाउंटन्सीसाठी 11 तर व्यवसाय अर्थशास्त्र विषयासाठी आठ जागा आहेत. शिक्षणशास्त्रला - 58, ग्रंथालय व माहितीशास्त्र - 9, पत्रकारिता व जनसंज्ञापन - 1, शारीरिक शिक्षणशास्त्र विषयासाठी 41 तर समाजकार्य विषयासाठी 7 जागा आहेत.

loading image