
सोलापूर: कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जुने विडी घरकुलमध्ये मंगळवारपासून (ता. 26) जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्याची मुदत आज संपली. सोमवारी नवीन नियमावलीनुसार घरकुलमधील किराणा दुकाने व भाजी विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचाः ...तर सोलापुरात त्वरीत होणार शटरडाऊन
विडी घरकुलमध्ये मंगळवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्याला अपवाद वगळता सर्वच नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. यादरम्यान विडी घरकुलमध्ये सात कोरोना व सारीबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी गेल्या दोन दिवसांत दोन रुग्ण आढळले. त्यामुळे जनता कर्फ्यूचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पुन्हा पुढे आला.
नगरसेवक प्रथमेश कोठे व विठ्ठल कोटा यांनी दुपारी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांची भेट घेतली. सायंकाळी परिसरातील सर्व किराणा दुकानदार व भाजी विक्रेत्यांची बैठक संभाजीराव शिंदे शाळा येथे घेण्यात आली. या वेळी झालेल्या चर्चेतून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू आणखी वाढवण्यापेक्षा दोन दिवस विक्रेते व ग्राहकांसाठी नवीन नियमावलीनुसार व्यवहार सुरू ठेवण्याचे सर्वानुमते ठरले.
जनता कर्फ्यूदरम्यान जंतुनाशकाची फवारणी व घरोघरी थर्मल स्क्रिनिंगद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात आली. विडी घरकुलमध्ये जवळपास 35 हजार लोकसंख्या असून, आतापर्यंत 11 हजार नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. येत्या दोन दिवसांत सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती नगरसेवक श्री. कोटा यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
-
अशी आहे नवीन नियमावली
- सोमवारपासून सकाळी सात ते 11 पर्यंत किराणा व मटन-चिकनची दुकाने चालू राहतील.
-गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केटऐवजी विक्रेत्यांचे गट तयार करण्यात आले असून, ठरलेल्या परिसरातच कुठेही न बसता फिरून भाजी विक्री करायची आहे.
- किराणा दुकानदारांना ग्राहकांनी एका पिशवीत सामानाची यादी व मोबाईल क्रमांक द्यायचा व घरी जायचे. दुकानदाराने सामानाची पॅकिंग केल्यानंतर संबंधित ग्राहकाला दुकानाला बोलवायचे किंवा घरपोच डिलिव्हरी करायची.
- मटन-चिकन दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे.
- मास्क व हॅंडग्लोव्हज न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका पथक फिरणार असून, सुरक्षा साधने न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.