
बेळगाव, सोलापूर पॅसेंजर सुरू करा
मिरज : मिरज-बेळगाव, लोंढा, हुबळी, कॅसरलॉक, परळी, पंढरपूर व सोलापूर पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी सेनेकडून स्टेशन अधीक्षक जे. आर. तांदळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच मिरज-मुंबईकरिता नव्याने एक्स्प्रेस सुरु करण्याची मागणी केली. यावेळी प्रवासी सेनेचे अध्यक्ष किशोर भोरावत, संदीप शिंदे, राजेंद्र पाटील उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर निर्बंध शिथिलतेनंतर रेल्वे प्रवासी, पर्यटक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. तसेच एक्स्प्रेस गाड्यांची वाढती गर्दी लक्षात घेता. पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांनाचे दोनशेहून अधिक प्रतीक्षा सुरु आहे. कोरोनामध्ये गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या मिरज ते बेळगाव, हुबळी, लौंढा, केसरलॉक, पंढरपूर व सोलापूर पॅसेंजर सुरू करण्यात याव्यात.
या सर्व पॅसेंजर गाड्या मध्य रेल्वेच्या पुणे व सोलापुर विभागाकडून चालवल्या जातात, परंतु करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने व निर्बंध शिथिल झाल्यामुळे देशभरामध्ये बऱ्याच ठिकाणी पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. परंतु मिरज मधून बेळगाव, लोंढा, कॅसरलॉक, हुबळी व पंढरपूर आणि सोलापुर या मार्गावरील ऐकही पॅसेंजर गाडी सुरू करण्यात आलेली नाही. सध्या उन्हाळी सुट्टयांचा हंगामा असून लग्नसराई आहे. कर्नाटक व गोवा या राज्यातून लोक वैद्यकीय उपचाराकरिता मिरज येथे येत-जात असतात. पॅसेंजर गाडी ही सर्वसामान्यांची गाडी म्हणून ओळखले जाते. सध्या या गाड्या बंद असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत जेष्ठ नागरिक, महिला, अपंग, विद्यार्थी, कामगार वर्ग यांना सोयी व सुविधांची आपलीशी वाटणारी पॅसेंजर गाडी सुरू करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी सेना, रेल्वे प्रवासी संस्था, व रेल्वे सल्लागार समिती सदस्यांनी केली आहे.
Web Title: Belgaum Solapur Train Service Passenger
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..