वाचा... माळशिरस तालुक्‍यातील कर्जमाफीचे लाभार्थी 

Beneficiaries of loan waiver in Malshiras taluka
Beneficiaries of loan waiver in Malshiras taluka

वेळापूर (जि. सोलापूर) : महाविकास आघाडी शासनाच्या बहुचर्चित महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना - 2019 अंतर्गत तालुक्‍यातील 11 हजार 35 आणि वेळापूरमधील 194 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आज येथे घोषित करण्यात आली. 


सोलापूर जिल्ह्यातून प्रायोगिक तत्त्वावर निवडलेल्या वेळापूर आणि मंद्रूप या गावातील लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकलूज उपविभागीय अधिकारी शमा पवार यांच्या उपस्थितीत वेळापूर आणि माळशिरस तालुक्‍यातील कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तलाठी कार्यालय, वेळापूर येथे सार्वजनिक करण्यात आली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वेळापूर शाखेत पत्रकार आणि उपस्थितांसोबत शमा पवार यांनी कर्जमाफी प्रक्रियेबाबत संवाद साधला. यादी घोषित होताच कर्जमाफी प्रक्रिया सिस्टममधून सुरूही झाली. घोषित केलेल्या माळशिरस तालुक्‍यातील 11 हजार 35 लाभार्थींपैकी 7 हजार 563 व वेळापूरातील 194 पैकी 104 शेतकरी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे कर्जदार आहेत. उर्वरित लाभार्थी राष्ट्रीयकृत व ग्रामीण बॅंकातील कर्जदार आहेत. 


यावेळी तहसीलदार अभिजीत पाटील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था देविदास मिसाळ, वेळापूरचे सर्कल विलास रणसुभे, तलाठी रघुवींद्र ओरके, वेळापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, उघडेवाडी विकास सोसायटीचे चेअरमन अजितसिंह माने देशमुख, तुकाराम भुसारे, तुकाराम मोहिते, महादेव ताटे, बॅंक इंस्पेक्‍टर यु. एम. दीक्षित, व्ही. डी. फडतरे, शाखाधिकारी एल. डी. पिसे, सचिव दीपक माळवदकर, भागवत मिले आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com