
-अरविंद मोटे
सोलापूर: सोलापूरकरांना गोव्यापेक्षा अधिक गरज ही मुंबईच्या विमानसेवेची आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच स्टार एअरलाइन्सची सेवा सोलापूर विमानतळावर सुरू होणार आहे. मुंबईच्या विमानतळावर फक्त सकाळचा स्लॉट मिळणे बाकी आहे. बंगळूर- सोलापूर- मुंबई अशी सेवा सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी आवश्यक असलेले कर्मचारी- अधिकारी भरतीसाठी विमान कंपनीकडून जाहिरात काढण्यात आलेली आहे. स्टार एअरलाइन्सने इंदूर, गोंदिया आणि सोलापूर विमानतळासाठी विमानतळ व्यवस्थापक, ग्राहकसेवा प्रतिनिधी व सुरक्षा अधिकारी पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यावरून नक्कीच पुढील महिन्यात स्टार एअरलाइनची सेवा सोलापूरमध्ये सुरू होईल.