भगवंत नगरी : दुर्लक्षित तीर्थक्षेत्राचा धांडोळा

देशातील हे एकमेव भगंवत मंदीर असून दुर्लक्षित तीर्थक्षेत्र राहिलं आहे.
Bhagwant_Barshi
Bhagwant_Barshi
Updated on

-- प्रशांत घोडके, बार्शी

नर्गिस दत्त कर्करोग रुग्णालय, ज्वारी, डाळी आदींसह आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू प्रार्थना ठोंबरे आदी गोष्टींमुळे जगभरात ख्याती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी हे ठिकाण प्राचीन काळापासून 'भगवंत नगरी' म्हणून ओळखली जाते. बार्शीचं ग्रामदैवत असलेल्या श्री भगवंत मंदिरात आज वैशाख द्वादशीला श्री भगवंत जन्मसोहळा साजरा होत आहे. भूवैकुंठ समजलं जाणारं तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये एकादशीला श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर द्वादशीला बार्शीच्या श्री भगवंताचे दर्शन घेण्याची प्राचीन काळापासून परंपरा आहे. (Bhagwant Nagari a quest of neglected pilgrimage sites)

Bhagwant_Barshi
अयोध्या दौरा : राज ठाकरेंना आता भोजपुरी गाण्यातून इशारा!

भगवंत नगरी बार्शीतील हे श्री भगवंताचे मंदिर अंदाजे सन १२४५ मध्ये हेमाडपंथी कला शैलीत बांधण्यात आलंय. राजा अंबरीषच्या रक्षणासाठी साक्षात श्री विष्णूने लक्ष्मीसह 'भगवंत' या नावाने येथे अवतार घेतल्याचा पुराणात उल्लेख आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यासमोर गरूड खांब आहे. नक्षीदार कलाकुसर असलेल्या मंदिराचा सभामंडप सुमारे २०० वर्षांपूर्वीचा असावा, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. याच मंदिर परिसरात श्री गुरुदेव दत्त, श्री गणेश, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री हनुमान आदी देवतांच्या मूर्ती व लहान मंदिरे आहेत.

भगवंताचे सोळा खांबी मंदिर आणि गरुड खांब मंदिराचे आध्यत्मिक आणि प्राचीन महत्व अधोरेखित करतात. हे संपूर्ण आशिया खंडातील हेमाड या पाषाणात कोरलेले एकमेव मंदिर आहे. मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्वमुखी आहे. श्री भगवंतांची मूर्ती काळ्या पाषाणाची असून भगवंताच्या हातात शंख, चक्र व गदा आहेत. श्री लक्ष्मीची मूर्ती भगवंताच्या पाठीशी आहे तर राजा अंबरिषाची मूर्ती भगवंतांच्या उजव्या हाताशी चरणाजवळ आहे. भगवंताच्या कपाळावर शिवलिंग असून छातीवर भृगू ऋषींच्या पायचे ठसे आहेत. या मंदिराला नानासाहेब पेशवे यांच्याकडून सन १७६० मध्ये तर ईस्ट इंडिया कंपनीकडून सन १८२३ मध्ये व ब्रिटिश सरकारकडून सन १८८४ मध्ये इनाम मिळाल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.

Bhagwant_Barshi
ओबीसी आरक्षण: आदर्श उत्तरासाठी तिन्ही सरकारांचे प्रयत्न आवश्यक - नरके

मंदिराची देखभाल पंचकमिटीमार्फत केली जाते. मंदिरातील नित्यसेवा बडवे कुटुंबाकडून केली जाते. या नित्यसेवेमध्ये पहाटे काकडा आरती, पूजा, महापूजा, दुपारी नेवेद्य, संध्याकाळी धूपआरती, विडा, रात्री शेजारती संपन्न होते. एकूण १७ पुजारी मंदिराजवळील परिसरात राहत असून सध्या सुमारे सातवी-आठवी पिढी भगवंताच्या पूजा कार्यात कार्यरत आहे. चैत्र, मार्गशीर्ष, आषाढ व कार्तिक एकादशी- द्वादशीला भक्तांची भगवंत मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असते. कार्तिक आणि आषाढ पौर्णिमेस छबिना काढला जातो तर कार्तिक आणि आषाढ एकादशीला नगरप्रदक्षिणा होते. यांसह वर्षभरात विविध सण-उत्सव जसे की चतुर्थी विशेष पूजा, विशिष्ट पोशाख सजावट पूजा, नवरात्र उत्सव, तुकाराम बीज, दत्त जन्म सोहळा, श्रावणातील उत्सव, श्री कृष्ण जन्म सोहळा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्री भगवंत जन्म सोहळा पार पडतो. परंपरेनुसार भगवंताची चंदन, उटी, लेप आणि वर्षभर विविध प्रकारे आकर्षक पोशाख व सजावट करून पूजा आणि इतर उपक्रम राबविले जातात त्यासाठी बडवे परिवारातील सदस्य विशेष परिश्रम घेत असतात.

Bhagwant_Barshi
यूपीत मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; योगी सरकारचा मोठा निर्णय

बार्शीची भूमी ही भगवंताच्या शाश्वत सानिध्याने पवित्र क्षेत्र आहे. धार्मिक स्थळांचा विचार करता बार्शीनंतर अनेक तीर्थस्थळांचा विकास झाला. त्याची व्यवस्थित प्रसिद्धी झाली. मात्र भगवंत नगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या बार्शीची हवी तेवढी प्रसिद्धी न झाल्याने इथली तीर्थक्षेत्र विकासकामे झाली नाहीत. भगवंत मंदिराचे वैभव जतन करण्यासाठी पंच कमिटी आटोकाट प्रयत्न करत आहे. लोकसहभागातून पंचकमिटी उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारे जीर्णोद्धाराचे काम करीत आहे. या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या भरीव मदतीची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com