Minister Bharat Gogawale and MLA Abhijeet Patil during the Kartiki Yatra visit to Pandharpur
esakal
पंढरपूर,: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांना शिवसेनेचे नेते तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी थेट मंत्रीपदाची ऑफर दिल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मंत्री गोगावले काल कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत आमदार अभिजीत पाटील हे दिवसभर फिरत होते. दरम्यान एका कार्यक्रमात मंत्री गोगावले यांनी अभिजीत पाटील यांना शिंदे शिवसेनेमध्ये या, तुम्हाला मंत्री करतो, अशी ऑफरच दिली. मी माझे अडीच वर्षांचे मंत्रीपद तुमच्यासाठी सोडतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.