

Bhima river floods again after massive Ujani dam release; 152 TMC discharged, 90,000 cusecs flowing downstream.
Sakal
सोलापूर : परतीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यासह उजनीच्या पाणलोट क्षेत्रात धुमाकूळ घातला असून उजनी धरणात मोठा विसर्ग जमा होत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आता जेवढा विसर्ग येईल तो भीमा नदीतून सोडून दिला जात आहे. त्यामुळे २०२० नंतर यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा भीमा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या उजनीतून भीमा नदीत ९० हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असून वीर धरणातूनही साडेसात हजाराचा विसर्ग सुरू आहे.