
After rains ease, Sina dam cuts discharge; Bhima river still carries 1.25 lakh cusecs water.
Sakal
सोलापूर : सीना कोळेगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील परांडा, भूम (जि. धाराशिव), आष्टी (जि. बीड), अहिल्यानगर, कर्जत, जामखेड (जि. अहिल्यानगर) येथे रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. सोलापूर जिल्ह्यातही बार्शी, माढा, करमाळ्यासह सर्वच तालुक्यांत पाऊस थांबल्याने सीना कोळेगाव प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. येवा घटल्याने, पाऊस थांबल्याने सीना नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचाही विसर्ग घटला आहे.