

Mohol Bhima Sugar Factory Announces Diwali Gift of 25 Kg Sugar for Members and 10 Kg Free Sugar for Employees
esakal
मोहोळ: टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील स्व.भीमराव (दादा)महाडिक मल्टीस्टेट साखर कारखान्याच्या वतीने यंदा दिवाळी निमित्त कारखान्याच्या सर्व सभासदांना व कामगारांना साखरेची गोड भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत असल्याचा दावा कारखाना प्रशासना कडुन करण्यात आला असून, या नुसार प्रत्येक सभासदाला 30 रुपये प्रतिकिलो दराने 20 किलो व 5 किलो साखर मोफत, अशी एकूण 25 किलो साखर दिली जाणार आहे. कारखान्यातील कामगारांनाही 10 किलो साखर मोफत देण्यात येणार आहे.