
भोसे सोसायटीच्या अध्यक्षपदी रावसाहेब पाटील बिनविरोध
भोसे : भोसे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी जेष्ठ नेते रावसाहेब (चंद्रकांत) पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सोसायटीच्या सभागृहात झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच गणेश पाटील, कृषिराज शुगरचे संचालक शेखर पाटील, सोसायटीचे चेअरमन बंडू गावडे, चांगदेव जमदाडे, यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेचे चेअरमन जयवंत गावंधरे, संचालक शहाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदासाठी रावसाहेब पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सचिव भिवा वगरे यांनी घोषित केले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष गणेश पाटील म्हणाले की, वार्षिक सुमारे ३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करणारी ही सोसायटी भविष्यातही शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून काम करेल. आपली सोसायटी दरवर्षी जानुबाई देवीच्या यात्रेला लाभांश वाटप करत होती, मात्र सध्या बँकेच्या अटींमुळे सोसायटीचे ऑडिट झाल्याशिवाय लाभांश वाटप करु शकत नाही, मात्र दीपावली सणावेळी लाभांश वाटप केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या निवडीवेळी मधुकर माळी, सोमनाथ थिटे, विश्वनाथ भिंगारे, नागनाथ भांडे, नितीन कोरके, इलाही मुलाणी, जानुबाई सोसायटीचे नूतन संचालक नागेश गावंधरे, यांच्यासह सोसायटीचे आजी माजी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सोसायटीचे सचिव सुनील तळेकर यांनी केले.
Web Title: Bhose Society Unopposed Chairman
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..