esakal | कोरोनाविरुद्ध एकवटले भोसेकर ! एकत्र लढ्यास येतेय यश; "असा' आहे ऍक्‍शन प्लॅन

बोलून बातमी शोधा

Corona

कोरोनाविरुद्ध एकवटले भोसेकर ! एकत्र लढ्यास येतेय यश; "असा' आहे ऍक्‍शन प्लॅन

sakal_logo
By
गुरुदेव स्वामी

भोसे (सोलापूर) : अचानक गावावर आलेले कोरोनाचे संकट, त्यातून दररोज होत असलेले मृत्यू, पॉझिटिव्ह सापडत असलेली वाढती रुग्णसंख्या यामुळे भोसे (ता. मंगळवेढा) येथील ग्रामस्थ भयभीत झाले. त्यांना दिलासा देण्यासाठी तालुकास्तरीय प्रशासनाला सोबत घेऊन भोसे येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तरुण वर्ग, गाव कामगार तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक व पत्रकार आदींनी न घाबरता भोसेकरांवर आलेले संकट टाळण्यासाठी एकत्रितरीत्या उभ्या केलेल्या लढ्यास काही प्रमाणात यश येत असल्याने घाबरलेल्या भोसेकर ग्रामस्थांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

भोसे गाव मंगळवेढा तालुक्‍यातील सर्वांत मोठे लोकसंख्येच्या दृष्टीने असणारे गाव. या गावावर एप्रिलच्या 10 तारखेनंतर अचानक कोरोना महामारीचे संकट आल्याने व मृत्यूचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. भोसे येथे कोरोना महामारीचा झालेला संसर्ग रोखण्यासाठी क्षणाचाही विलंब न लावता उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी सुप्रिया जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी नंदकुमार शिंदे यांनी तत्काळ गावातील प्रमुख पदाधिकारी तानाजी काकडे, सूर्यकांत ढोणे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पत्रकार, स्वयंसेवक, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व शिक्षक आदी सर्वांची बैठक घेऊन तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा: पालकमंत्री हताश ! म्हणाले "डॉक्‍टरांच्या पाया पडतो, त्यांनी कोव्हिड सेंटरसाठी पुढाकार घ्यावा'

या आदेशाची अंमलबजावणी करत गाव कामगार तलाठी जयश्री कल्लोळे, ग्रामविकास अधिकारी अविनाश मोरे यांनी भोसे येथील पाच प्रभागांत प्रत्येकी तीन ग्रामपंचायत सदस्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, शिक्षण, कृषी आदी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रभागनिहाय टीम तयार केली. गाव परिसर, वाड्या- वस्त्या आदी सर्व ठिकाणी कोरोना चाचणी घेण्यास प्रारंभ केला. प्रत्येक प्रभागाची जबाबदारी त्या- त्या ग्रामपंचायत सदस्यांवर देऊन चाचण्यांचे प्रमाण वाढवत पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांना भोसे केंद्र शाळेत सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भोसे येथील परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे. विलगीकरण कक्षात येण्यास नकार देणाऱ्या रुग्णांना पोलिस उपनिरीक्षक सत्यजित आवटे व इतर पोलिस कर्मचारी प्रसंगी बळाचा वापर करून विलगीकरण कक्षात आणत असल्याने येथील संसर्ग रोखण्यासाठी फार मोठी मदत झाली आहे.

भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात असणारी अपुरी आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव असे असताना देखील या आणीबाणीच्या काळात भोसे आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर निवर्गी. संतोष पट्टणशेट्टी, अनुवीरेश संक, महादेव किट्टद, आरोग्य सहाय्यक पी. आर. पाटील, श्रीकांत स्वामी, सी. आर. कुलकर्णी, गुंडाप्पा लेंडवे, आरोग्य सेविका संजीवनी मते, अश्विनी हिंगमिरे, सखूबाई घाडगे, सुकेशनी माने, सी. आर. वेदपाठक, रूपाली कोळी, आरोग्य सहाय्यक जाधव, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आदी कर्मचारी त्याचबरोबर प्राथमिक शाळेतील शिक्षक, कृषी विभागाचे कर्मचारी, गावातील बाळासाहेब काकडे, अप्पासाहेब निकम, सतीश भोसले,

हेही वाचा: मृत्यूदरात "दक्षिण' पहिल्या तर अक्‍कलकोट दुसऱ्या क्रमांकावर ! उपचाराच्या विलंबामुळेच वाढले मृत्यू

सचिन नागणे, अशोक भगरे, संजय खडतरे, भारत मोरे आदी युवावर्ग स्वतःला झोकून देऊन भोसेकरांवर आलेले संकट दूर करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत असल्याने भोसे येथील संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत होत आहे.

भोसे गावामध्ये सर्वांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असताना, मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्धरीत्या कामकाज चालू असल्याने काही प्रमाणात हा संसर्ग रोखण्यात यश मिळाले. अजून तीन- चार दिवस असेच अथक परिश्रम घेतल्यास भोसे येथील संसर्ग पूर्णपणे आटोक्‍यात येण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी पूर्णपणे सहकार्याची भावना ठेवावी.

- जयश्री कल्लोळे, गावकामगार तलाठी, भोसे