esakal | ब्रेकिंग! आता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचीही परीक्षा होणार रद्द, "ही' आहेत कारणे...

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग! आता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचीही परीक्षा होणार रद्द, "ही' आहेत कारणे...

गोंडवाना, मुंबई विद्यापीठाने व्यक्त केली पावसाची भीती

ब्रेकिंग! आता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचीही परीक्षा होणार रद्द, "ही' आहेत कारणे...
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : जून महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे परीक्षा केंद्रांची दुरावस्था होते तर विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या या भागात बहूतांश परीक्षा केंद्रे आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात परीक्षा घेताना खूप मोठ्या अडचणींची शर्यत पार करावी लागेल, असे गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाने राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाला कळविले आहे.

राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. मात्र, पाऊस असो किंवा धोरणाचा वाढणारा विळखा असो, यामुळे कोणत्याही एका विद्यापीठाची परीक्षा रद्द झाल्यास सर्वच विद्यापीठाची परीक्षा रद्द होईल. 31 मेपर्यंत प्रात्यक्षिक परिक्षा घ्याव्यात असे, समितीने सांगितले आहे, परंतु लॉकडाउन वाढल्याने आणि बहूतांश महाविद्यालयांच्या इमारती कोरोना संशयितांना ठेवण्यासाठी घेतल्याने प्रात्यक्षिक परीक्षा अद्याप सुरु झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाहीत, याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे 20 जूनपर्यंत जाहीर करतील. - डॉ. देवानंद शिंदे, सदस्य, राज्यपाल नियुक्त राज्यस्तरीय समिती

Big News - क्या बात हैं ! प्लाझ्मा थेरपी अखेर यशस्वी, नायरमधील रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा

राज्यात वाढत असलेला कोरोनाचा विळखा, सोशल डिस्टन्समुळे बेंच व वर्गखोल्यांची कमतरता, पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची भीती, प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी कमी पडणाऱ्या प्रयोगशाळा आणि गोंडवाना व मुंबई विद्यापीठाने सांगितलेली पावसाची अडचण, तीन सत्रात परिक्षा घेण्याचे नियोजन मात्र, परजिल्ह्यातील तथा परराज्यातील व परदेशातील मुलांच्या राहण्याचा प्रश्न, या सर्व कारणांमुळे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचीही परीक्षा रद्द करण्याचे निर्णय विचाराधिन असल्याचे राज्यस्तरीय समितीतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे प्रथम व द्वितीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 ते 31 जुलैपर्यंत घेण्याचे ठरले. त्याचवेळी राज्यातील कोणत्याही विद्यापीठास परीक्षा घेण्यास अडचण निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून अन्य विद्यापीठांच्या परीक्षाही रद्द होतील, असे राज्यपाल नियुक्त राज्यस्तरीय समितीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. जून पासून आता राज्यात पावसाला सुरुवात होणार असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाने परीक्षा घेण्यास पावसाचा मोठा अडथळा ठरू शकतो, असे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे कोरोनाच्या भितीने विद्यार्थी यापूर्वीच त्यांच्या मूळगावी परतले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी त्यांना जाणे सोयीस्कर नसल्याचे चित्र असून प्रयोगशाळाही मर्यादित असल्याने सोशल डिस्टन्स ठेवून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. कर राज्यात मागील 17 दिवसात कोणाच्या रुग्णांचा आलेख वाढला असून तब्बल 18 हजार रुग्णांची वाढ या कालावधीत झाली आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून परीक्षा घेण्यासाठी विविध अडचणी समोर येत आहेत. तरिही विद्यापीठ व महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी म्हणून अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय निर्णय घेणार, याची उत्सुकता लागली आहे. तत्पूर्वी, ते राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून अडचणींची माहिती घेतील आणि त्यानंतर ते 20 जूनपर्यंत निर्णय जाहीर करतील, असेही सूत्रांनी सांगितले.

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिकृत आमदार, घेतली आमदारीकीची शपथ... 

परीक्षा रद्द होण्याची 'ही' राहणार प्रमुख कारणे

  • गोंडवाना (गडचिरोली) व मुंबई विद्यापीठाने व्यक्त केली पावसाची भीती; परीक्षा घेण्यास अडचणी येणार असल्याचे राज्यस्तरीय समितीला स्पष्ट केले
  • राज्यात कोरोनाचा वाढतोय विळखा; मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, अकोला या शहरांमध्ये वाढत आहे कोरोनाबाधित रुग्णसंख्या
  • कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी राज्यातील बहूतांश महाविद्यालयांच्या इमारतींमध्ये सुरू केले आहेत विलगीकरण कक्ष
  • अंतिम वर्षातील सुमारे दहा लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 31 मेपर्यंत घेण्याचे होते नियोजन; लॉकडाउन बरोबरच रुग्णसंख्याही वाढल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलावून प्रात्यक्षिक परीक्षा घेणे अशक्य असल्याचे विद्यापीठांचे स्पष्टीकरण
  • सोशल डिस्टन्स ठेवून परीक्षा घ्यायच्या असल्याने बेंच व इमारती पडताहेत कमी; तीन सत्रात लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन, मात्र प्रात्यक्षिकासाठी प्रयोगशाळा मर्यादित असल्याने निर्माण झाल्या आहेत अडचणी
  • लॉकडाउननंतर कोरोनाच्या भीतीने विद्यार्थ्यांनी गाठले त्यांचे मूळगाव; प्रवासी वाहतूक बंद असल्याने परजिल्हा, परराज्यातील तथा परदेशातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेला जाणे अशक्य; राहण्यासही अडचणी

परीक्षा रद्द झाल्यावर 'असा' लगणार निकाल

प्रथम व द्वितीय वर्षातील परीक्षा रद्द झाल्यानंतर आता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निकाल 50 टक्के अंतर्गत गूण व 50 टक्के गूण अंतिम वर्षातील लेखी परीक्षांच्या एकत्रित मूल्यमापनावर अधारित जाहीर केला जाणार आहे. मात्र, परीक्षा रद्द झाल्यास विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मागील सत्रातील गुणांच्या सरासरीवरुन 50 टक्के गूण तर वर्षभरातील चाचण्या व प्रात्यक्षिकावरुन अंतर्गत मुल्यमापनावर 50 टक्के गूण दिले जातील. त्यानुसार निकाल जाहीर होईल, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

big news related to last year university exams might be cancelled read full report