अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिकृत आमदार, घेतली आमदारीकीची शपथ... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे उपस्थित होते. 

विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमदारकीची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह आठ आमदारांनाही शपथ दिली गेली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य आजपासून अधिकृत आमदार झालेत. विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानभवनात या सदस्यांना शपथ दिली. 

या नऊ सदस्यांमध्ये शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हे, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड, तर भाजपचे रमेश कराड, प्रविण दटके, गोपीचंद पडाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व 9 उमेदवारांचा शपथविधी सोहळा आज विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडला. 

अनागोंदी कारभाराची हद्द ! धारावीतल्या पॉझिटिव्ह कुटुंबाला सोडलं घरी सोडले घरी आणि पुढे जे घडलं...

सहा महिन्यांच्या आत दोनवेळा शपथविधी 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्या नंतर सहा महिन्यांच्या आत त्यांनी आमदार म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यात दोन वेळा म्हणजेच एकदा मुख्यमंत्रीपदाची आणि दुसरी आमदारकीची शपथ घेतली आहे. यासोबतच महाविकास आघाडी आणि भाजपचे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारही शपथ घेतली.

बिनविरोध निवडणूक 

महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक ही 21 मे दिवशी होणार असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं होतं. कॉंग्रेस पक्षाकडून एक उमेदवार मागे घेण्यात आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. काँग्रेसनं आपले दोन उमेदवार जाहीर केल्यानं सर्वांपुढे पेच निर्माण झाला होता. पण आता ही निवडणूक बिनविरोध करण्यात सार्‍याच राजकीय पक्षांना यश आलं आहे. 

सारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्सिइड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सिया?

ठाकरेंच्या घरात दोन आमदार 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आमदारकीची शपथ घेतल्यानंतर ठाकरे घरात आणखी एका आमदाराची भर पडली आहे. आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक जिंकली आणि पहिल्यांदाच ठाकरे घराण्यात आमदारकीचा शिक्का बसला. आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले असतील ज्यांनी निवडणूक लढवली. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारर्किदीत एकदाही निवडणूक लढवली नव्हती. त्यानतर आता उद्धव ठाकरेंची विधानपरिषदेवर बिनविरोध झाली आणि ते सुद्धा आमदार झाले. त्यामुळे ठाकरेंच्या घरात दोन व्यक्ती ते सुद्धा पितापुत्र एकाचवेळी विधीमंडळाचे सदस्य झाल्यानं  ठाकरे घराण्यात एका वेगळ्याच इतिहासाची नोंद झाली आहे.

CM uddhav thackeray took oath as member of legislative council read full news  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM uddhav thackeray took oath as member of legislative council read full news