
सोलापूर : सर्व जिल्ह्यातील राजकारणाच्या धक्कादायक घडामोडी कमी होण्याचे नाव सध्या तरी दिसत नाही. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यानंतर आता सोलापूरच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पती श्रीशैल बनशेट्टी यांच्यासह जय महाराष्ट्र म्हणत बुधवारी सायंकाळी शिवसेना शिंदे पक्षात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी भाजपवर नाराज होऊन काँग्रेसमध्ये रमलेले प्राध्यापक अशोक निंबर्गी हे देखील या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते.