सोलापूर : हिंदू मतदार काँग्रेस पक्षाला सोडून गेला आहे. नगरपालिका निवडणुकीत फक्त आदिवासी बहुल भागात काँग्रेसला यश आले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झालेले आहे. काँग्रेसच ओरबडण्याचे धोरण थांबत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत बसणार नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली. महापालिकेच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षाशी युती करण्याचे अधिकारी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.