सोलापूरच्या युवकाने संशोधित केल्या बाईक आणि फोरव्हीलरच्या टेक्‍नोसर्व्हिस 

mayur4.jpg
mayur4.jpg
Updated on

सोलापूरः स्वनिर्मितीला (क्रिएटिव्ह सेन्स) चालना द्यायची म्हणून एकाच दिवसात नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नवे काही करायचे याचा विचार करत असताना बाईक कोटींगची एक संकल्पना मिळाली. त्यावर अनेक महिने संशोधन केल्यानंतर बाईक व चारचाकी गाड्यामधील सर्व्हिसिंगबद्दल नव्या प्रकारच्या संशोधनाची दिशा मिळाली. त्यामध्ये दोन नव्या केमीकलचा उपयोगाचा शोध लागला. स्वतःच्या वेगळ्या ऍटोमोबाईल वाहनांसाठी टेक्‍नोसर्व्हिस विकसित करणे शक्‍य झाले अशी भावना मयुर देवरमनीने व्यक्त केली. 


शहरातील भवानी पेठ येथील मयुर देवरमनी या तरुणाचा संशोधनातून नविन सेवा निर्माण करण्याचा प्रवास अत्यंत वेगळा आहे. 

मयुर हा मुळातच आर्ट टिचर म्हणून नोकरीत स्थिरावलेला युवक. पण त्याच्या कलात्मक दृष्टीला नोकरीत योग्य स्पेस मिळत नाही हे लक्षात आले. तेव्हा एका दिवसात निर्णय घेऊन त्याने त्याच दिवशी नोकरी सोडली. तीन महिने नेमके काय करायचे याचा विचार केला तेव्हा बाईक कोटींगच्या तंत्राचा अभ्यास सुरु झाला. पारंपारिक बाईक कलरमध्ये वापरले जात असलेले तंत्रज्ञान वाहनाच्या देखभालीसाठी फारसे सोयीचे नसल्याचे लक्षात आले. तेव्हा नव्या तंत्रासाठी युट्युब व युरोपाचा अभ्यास सुरु केला. अनेक प्रकारचे प्रयोग करून सध्याचे वापरले जाणारे तंत्र उपयुक्त नसल्याचे आढळले. त्यामध्ये प्लॅस्टिकबेस एैवजी अन्य प्रकारचा बेस वापरण्याचे त्याने ठरवले. सुरवातीला एका गल्लीत छोटे गॅरेज टाकून इतर मॅकनिकच्या सोबत कामाचा अनुभव देखील त्याने घेतला. काही दुचाक्‍यांचे इंजिन बाहेरील भागात असल्याने त्याच्या देखभालीसाठी वेगळे संशोधन केले. 
मयुरने या कामात वापरल्या जाणाऱ्या रसायनांची मर्यादा लक्षात घेत बाहेरील देशातून रसायने मागवली. त्यांच्या वापरामुळे कामांची गुणवत्ता अधिक वाढली. नंतर मयुरने गाड्यांचे रीस्टोअरेशन चे तंत्र विकसित केले. हे काम पारंपारिक मॅकॅनिकल सव्हिसिंग तंत्रापेक्षा वेगळे ठरले. या पध्दतीने दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी बफिंग, डेंटींग, पेंटिंग, इंटरीअर व रिस्टोअरेशन या संशोधित टेक्‍नोसर्व्हिस त्याने सुरू केल्या. मयुरने कोणत्याही पारंपारिक तंत्राची कॉपी करणे नाकारत स्वतःचे तंत्र विकसित केले. या कामात मयुरचा भाऊ प्रसाद देवरमनी, कुटुंबीय व मित्रांनी साथ दिली. 

संशोधन महत्वाचे 
ऍटोमोबाईल वाहनांमध्ये पारंपारिक ट्रेंड बदलण्याचे काम करताना बराच काळ संशोधन केले. त्यानंतर आता निश्‍चित पध्दतीने काही काम करता येत आहे. 
- मयुर देवरमनी, भवानीपेठ सोलापूर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

 Solapur Political News
Milk Rate
Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Marathi News Esakal
www.esakal.com