Tragic Accident: सोलापूरहून अक्कलकोटच्या दिशेने जाणारी कार दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेल्याने यात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. याप्रकरणी ट्रकचालक नागेश बाळू गर्जे व अज्ञात कारचालकाविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. तेव्हा पाठीमागून येणारी कार अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १५ ऑक्टोबर रोजी घडली.