Video : स्वातंत्र्याची कल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळी, मात्र कंगनाच्या वक्तव्याचा निषेध : पद्मश्री डॉ. कोल्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...मात्र कंगनाच्या वक्तव्याचा निषेध : पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे
स्वातंत्र्याची कल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळी, मात्र कंगनाच्या वक्तव्याचा निषेध : पद्मश्री डॉ. कोल्हे

...मात्र कंगनाच्या वक्तव्याचा निषेध : पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : वादग्रस्त सिनेअभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) भारताच्या स्वातंत्र्याविषयी वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. कंगनाच्या या वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी समर्थन केले. मात्र, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे (Dr. Ravindra Kolhe) यांनी कंगनाच्या 'त्या' विधानाचा निषेध केला आहे. डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे हे सध्या साकव फाउंडेशन आयोजित व्याख्यानमालेसाठी सोलापूर दौऱ्यावर आहेत.

हेही वाचा: 'विरोधकांची दुटप्पी भूमिका ST कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हानीकारक!'

स्वातंत्र्याच्या कल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. पण जेव्हा ब्रिटिशांचा ब्लॅक युनियन उतरवला आणि आपला तिरंगा चढला तेव्हाच स्वातंत्र्य मिळालं. दरम्यान, आजही अनेक लोक हे पारतंत्र्यातच आहेत. गरीब, दीनदुबळे, अनाथ, अपंग, वृद्ध, मूकबधिर, आदिवासी, भटका समाज यांना स्वातंत्र्य मिळालं का? हा आजही प्रश्नचिन्ह आहे. जो मनुष्य रात्री उपाशी झोपतो, तो निश्‍चितच विचार करतो, हेच का स्वातंत्र्य? यासाठीच का माझ्या वाडवडिलांनी आत्मबलिदान केलं? ज्यांच्यासाठी हे स्वातंत्र्य मिळालं, त्यांच्यापर्यंत पोटभर अन्न मिळत नसेल तर हे सुद्धा निषेधार्ह आहे, असं वक्तव्य डॉ. रवींद्र कोल्हे यांनी सोलापुरात केलं आहे.

डॉ. रवींद्र कोल्हे कंगना राणावतच्या वक्‍तव्याबाबत म्हणाले, जर कोणाला वाटत असेल की भारताला मिळालेलं स्वातंत्र्य पूर्णपणे नसून, ते भीक होतं, असं त्यांचं स्पष्ट मत असेल तर आणि ते त्याचं अधुरी समर्थन करत असतील तर ते निश्‍चितच निषेधार्ह आहे.

हेही वाचा: 'काम बंद' आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच !

या वेळी डॉ. स्मिता कोल्हे म्हणाल्या, स्वातंत्र्य हे सगळ्यांनी मिळून मिळवलं. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यवीरांसाठी एकेक रुपया दानपेटीत देणाऱ्यांपासून जे क्रांतिकारक घराघरात लपून बसले होते, त्यांना मदत करणारे असे कितीतरी हजारो हात स्वातंत्र्यासाठी झटले. हजारो शहीद झाले. आजकालच्या घडामोडींवरून असे लक्षात येते, की छोट्या-छोट्या गोष्टींचा प्रत्येक पक्षाकडून इश्‍यू केलं जातंय. आज अनेक खेड्यापाड्यांत पायाभूत सुविधा नाहीत, रस्ते नाहीत. बाळंतीण बाईला मैलोन्‌मैल अंतरावरील हॉस्पिटलपर्यंत पायपीट करावी लागते, तर हे खरोखरंच स्वातंत्र्य आहे का? आदिवासी समाजाला अजूनही स्वातंत्र्याचा अर्थ समजत नाही. आदिवासींचा स्वातंत्र्याचा प्रश्‍न वेगळा आहे अन्‌ आज स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालंय, असं म्हणाणाऱ्यांचा प्रश्‍न वेगळा आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची कल्पना कोणती असेल, हे आपण कसं सांगू शकू? तिच्या भावना काय आहेत, हे जेव्हा ऐकू तेव्हा तिचा निषेध करायचा की समर्थन करायचं, हे ठरवू.

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये

loading image
go to top